काजू बी शासन अनुदान योजना,नेमकी कशी आहे ?
नमस्कार मंडळी, आपण प्रभात मराठी द्वारे राज्यभरातील विविध योजनां बद्दल आढावा घेत असतो. तर आजच्या लेखातही आपण काजूचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या योजने बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
तर मंडळी आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांकरिता ‘काजू ‘बी’ शासन अनुदान योजना’ सुरु केली आहे. आणि या योजनेच्या अंमलबजावणी करिता ‘नोडल एजन्सी’ म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे.
मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केलेल्या आव्हानानुसार , सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपली काजू बी विक्रीची पावती तसेंच ७-१२ उतारा, आधार संलग्नित बचत बँक खाते क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इत्यादी तपशीलांसोबत आपला अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांकडे ३१ ऑगस्टपूर्वी सादर करावयचा आहे.
कोल्हापूर आणि कोकण जिल्हातील काजू उत्त्पादकांनी राज्य काजू मंडळाच्या मुख्य विभागीय कार्यालयांकडे तर इतर भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे आपले अर्ज सादर करून अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता. (काजू बी शासन अनुदान योजना)
(1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे)
राज्यातील काजू उत्पादकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ७-१२ वर काजू लागवडीखालील , झाडांची नोंद असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन हे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
आवडेल तिथे आणि कोठेही प्रवास, ही योजना नेमकी कशी आहे ? तुम्हाला माहित आहे का ?