गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 : अंतर्गत मिळणार १ लाख १६ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान !
शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी, याबरोबरंच शेती क्षेत्राचा विकास साधता येण्यासाठी सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. , शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो.
(गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024)
अशा प्रकरच्या योजनेद्वारे पशुपालकांना आर्थिक मदत करण्यात येत असते. गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान योजना ही पासुपालकांसाठी महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गाय गोठा बांधण्यासाठी एक लाख साठ हजार रुपयां पर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते .
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 योजनेचे स्वरूप काय आहे ?
योजनेसाठी अर्ज करू पाहणाऱ्या पशुपालकांकडे जर ३ जनावरे असतील तर त्यांना पशुशेड बांधण्याकरिता शासनाकडून ७५ ते ८० हजार रुपये अनुदान दिले जाते.
तसेंच एखाद्या पशुपालकाकडे जर तीन पेक्षा जास्त जनावरांची संख्या असेल तर, योजनेच्या माध्यमातून शेड उभारण्यासाठी शासनाकडून 1 लाख 16 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
याबरोबरच तुमच्याकडे असलेल्या गाई म्हशींची संख्याही जास्त असेल तर, सरकारद्वारे त्यांना १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते .
अशाप्रकारे करता येईल गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 साठी अर्ज
विहित नमुन्यातील अर्ज नमुना उपलब्ध आहे ते पाहून डाउनलोड करावा.
यानंतर गोठ्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे जमा करावा .
प्रस्ताव जमा केल्यानंतर आपल्या अर्जास मंजुरी देण्यात येते
आपल्याला जिथे गोठा बांधायचा आहे त्या जागेचे जिओ टॅगिंग करुन घ्यावे.
जिओ टॅगिंग नंतर आपल्याला वर्क ऑर्डर देण्यात येते.
गाय गोठा योजनेतील पीडीएफ मध्ये ही माहिती भरा !
अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे.
गाय गोठा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावर जमीन असेल तर ‘हो’ असे लिहावे. त्यानंतर सातबारा तसेच ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे. तसेच लाभार्थ्याला आपल्या गावचा रहिवासी पुरावा सुद्धा द्यावा लागणार आहे.
त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यावा लागेल. व त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीचे एक शिफारस पत्र द्यावे. तसेंच त्यामध्ये लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगण्यात येईल.
गाय गोठा योजनेच्या लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी झाल्यावर अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक्यानुसार पोचपावती मिळते.
इतर योजना :
MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !
Maha Dbt Biyane Yojana 2024: बियाणे अनुदान योजना
PM Kisan Samman Nidhi Yojana : १७ वा हप्ता कधी मिळणार , त्याआधीच करा ही कामे !