मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?
तर मंडळी प्रभात मराठी वर आपले सहर्ष स्वागत आहे ! प्रभात मराठीच्या माध्यमातुन आपण नवनवीन योजनांचा सविस्तर आढावा घेत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण अशाच एका नवीन योजने बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गेल्या काही दिवसांपासुनच अन्नपूर्णा योजनेबद्दल बरीच चर्चा होताना पाहायला मिळत होती. आणि आता नुकताच महाराष्ट्र शासनाने या योजनेबाबतचा जीआर (GR) देखील जाहीर केला आहे. तर नेमके या जीआर मध्ये काय सांगण्यात आले आहे. याच बद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत .
(मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र)
योजने मागची उद्दिष्टे :
- देशभरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे.
- अनेक कुटुंबियांना त्यांच्या स्वंयपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे.
- महिलांचे आरोग्यमान सुधारावे.
- महिलांना सक्षम बनविणे.
शासन निर्णय (मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र ):
2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभार्त्यांना तसेंच लाडकी बहीण योजनच्या लाभार्त्यांना सुद्धा या ‘ ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा’ लाभ घेता येणार आहे. असे सदर जीआर मध्ये सांगण्यात आले आहे.
प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या राज्यातील 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेंच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षीक 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेंच सदर योजना ही ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ या नावाने राबवण्यात येणार आहे.
योजनेसाठी पात्र कोण असेल ?
योजनेचा लाभ घेण्याकरिता गॅसजोडणी महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
रेशन कार्ड नुसार एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
14.2 kg वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल.
तर या होत्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने बद्दलच्या काही ठळक बाबी.
अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी प्रभात मराठी च्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा. आणी माहिती आवडल्यास आणखी पुढे शेअर करा.
हेही वाचा :
Ration card Update : 1 ऑगस्ट पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम !
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.