मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : राज्यातील सुशिक्षित पंरतू बेरोजगार तरुणांसाठी सरकार देणार 10 हजार स्टायपन…
लाडकी बहीण योजनेच्या मागोमाग आता महाराष्ट्र सरकार राज्यातील सुशिक्षित असून बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची योजना राबवत आहे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” असे या योजनेचे नाव असून, या योजनेअंतर्गत, राज्यतिल 10 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षणाची संधी देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे . तरुणांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे देण्यात येणार आहे .
या योजनेचा लाभ बारावी पास किंवा डिप्लोमा, त्यासोबतच पदवीधरांसाठी होणार आहे. बारावी पास विद्यार्थ्यांना 6000 रुपये , डिप्लोमा झालेल्यांना 8000 रुपये , तर पदवीधारकांना 10,000 रुपये असा स्टायपेंड सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार तरुणांना या योजनेद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची उद्दिष्ट ?
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे आहे हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे . योजने अंतर्गत तरुणांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल आणि यासोबतच त्यांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य देखील देण्यात येईल.
योजनेची व्याप्ती
या योजनेत 55,500 कोटी रुपयांचे बजेट राखण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेंच प्रशिक्षणाच्या काळात त्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळेल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता
अर्जदारचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण किंवा
ITI पास असणे आवश्यक.
ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार देखील पात्र आहेत.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आर्थिक सहाय्य
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी दरमहा ₹6000 स्टायपेंड
डिप्लोमा धारक विद्यार्थी: दरमहा ₹8000 स्टायपेंड
पदवीधर विद्यार्थी: दरमहा ₹10,000 स्टायपेंड.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
शैक्षणिक प्रमाणपत्रे
बचत खाते बँकेत असणे आवश्यक आहे आणि ते आधार कार्डशी जोडलेले असावे.
महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र
अर्ज प्रक्रिया ?
योजनेसाठी अर्जदारांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे.
अर्जदारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, निवासी प्रमाणपत्र आणि बँक खाते यांची माहिती भरणे आवश्यक आहे.
फॉर्म सबमिट करणे: सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
फॉर्म भरल्यानंतर अर्जदारांची माहिती तपासून, त्यांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल.
निवड झालेल्या तरुणांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षणाच्या काळात तरुणांना दरमहा ₹8000 किंवा ₹10,000 दिले जातील.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना नोकरीची संधी मिळवून देण्यात येईल.
योजनेची अधिकृत वेबसाइट लिंक
Prashikshan Yojana Official Website
https://rojgar.mahaswayam.gov.in
वरील माहिती आवडल्यास , पुढे पाठवा आणि अशाच माहिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा !
MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !