1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे…

1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे…

मंडळी तूम्हाला ठाऊक आहे का, की काही नवीन नियम हे महिन्याच्या पहिल्या दिवशी लागू होत असतात. आणि आता येणार्‍या 1 ऑगस्ट 2024 पासून नेमके कोणते नवे नियम आणि बदल होणार आहेत ? आणि या बदलांचा दैनंदिन जीवनावर , आर्थिक गोष्टीवर होणारा परिणाम या बद्दल आजच्या लेखात आपण चर्चा करणार आहोत.

1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे...
1 ऑगस्ट पासून बदलणार हे 5 नियम ! जाणून घ्या इथे…

HDFC क्रेडिट कार्ड नियम

मंडळी येत्या 1ऑगस्ट पासून HDFC Bank ही Tata neu infinity तसेच Tata neu plus हे क्रेडिट कार्ड संबंधित नियमां मध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. हे नवे बदल खालील प्रमाणे .

आता 50,000 रुपया पर्यंतच्या यूटिलिटी व्यवहारावर कोणत्याही प्रकाराचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

तसेच पन्नास हजार रुपयां पेक्षा जास्त व्यवहारांवर 100 रुपयांपैकी 1 रुपये वजा करण्यात येतील. मात्र ही वजावट 3,000 रुपयां पेक्षा जास्त नसणार आहे.

थर्ड पार्टी एप्लीकेशन अंतर्गत केलेल्या व्यवहारावर सुध्दा 1% आकारण्यात येईल.

विलंब शुल्काचे देखील नवे दर लागू केले जातील.

ईझी ईएमआय पर्यायांवर 299 रुपयां पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारण्यात येईल.

( हेही वाचा:  Ration card Update : 1 ऑगस्ट पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम ! )

एलपीजी सिलेंडर किमतीत होऊ शकतो बदल

दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या, त्यामुळे यावेळी सुध्दा घरगुती तसेच व्यावसायिक सिलेंडर च्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट मध्ये इतक्या दिवस बॅंका बंद !
ऑगस्ट महिन्यात एकूण 13 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या खालील प्रमाणे .

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी बॅंका बंद असतील.

संपूर्ण रविवार तसेच दुसरा व चौथ्या शनिवारी बॅंका बंद असतील.

19 ऑगस्ट रक्षाबंधन आणि 26 ऑगस्ट जन्माष्टमी या दोन्ही दिवशी बॅंका बंद असतील.

त्यामुळे या महिन्याच्या बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन आपल्या आर्थिक व्यवहाराविषयी नियोजन करावे .

गूगल मॅपच्या नियमांत बदल .

गूगल मॅप ने सुध्दा आपल्या सेवा मध्ये काही नवे बदल केले आहेत. त्यांनी आपले सेवा शुल्क 70% पेक्षा कमी केले असून, आता डॉलर्स ऐवजी भारतीय रुपयात शुल्क आकारण्यात येईल. या बदलांचा सामान्य गूगल मॅप वापरकर्त्यांवर कोणताही परिणाम होणार नसून हा बदल केवळ व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी आहे.

अशाच नवनवीन अपडेट साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हाट्सअ ग्रुप

(प्रभात मराठी _ व्हाट्सअप ग्रुप )

हेही वाचा:

Mini Tractor Yojana : बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर

Ration card Download : मोबाईलवरून ऑनलाइन रेशन कार्ड डाउनलोड करा 2 मिनिटांत !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment