आठवा वेतन आयोग 8th Pay Commission कधी होणार लागू ? किती वाढणार पगार ? जाणून घ्या इथे…
8th Pay Commission: 9 जुन रोजी माननीय नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून. शासन आता पुन्हा नव्याने कामाला लागले आहे . आणि येत्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय तसेंच काही गोष्टीत बदल होण्याची शक्यता आहे.
अशातच आता आठव्या वेतन (8th Pay Commission) आयोगाची देखील सर्वत्र चर्चा चालू आहे. परंतु आठवा वेतन आयोग हा येत्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2026 पासून लागू होण्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक दहा वर्षांनी केंद्र सरकार द्वारे नवा वेतन आयोग लागू करण्यात येत असतो . यापुर्वी म्हणजेच जानेवारी 2016 मध्ये आता सुरु असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.
कधी लागू होणार 8th Pay Commission आठवा वेतन आयोग ?
भारतामध्ये सर्वांत पहिला वेतन आयोग हा जानेवारी 1946 मध्ये लागू करण्यात आला होता.
केंद्र सरकारचे १ कोटी शासकीय कर्मचारी त्याबरोबरच सर्व पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. या आयोगाद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार असून या आयोगाच्या शिफारशी सुद्धा 2026 मध्येच लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
किती होते पगार वाढ?
आठव्या वेतन आयोगा द्वारे साधारणता ४९ लाख शासकीय कर्मचारी तसेंच ६८ लाख पेन्शनधारकांना चांगलाच फायदा होणार आहे. या नव्या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचीही शिफारस करण्यात येणार आहे .
सातव्या वेतन आयोगात 14 टक्क्यांनी होणार पगारवाढ ?
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारणपणें १४.२९% टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. यासह कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनही 18 हजार रुपये करण्यात आले होते. म्हणूनच यावेळी सुद्धा आठव्या वेतन आयोगातर्फे चांगल्या शिफारशी केल्या जातील, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
तसं पाहायला गेलं तर, आठव्या वेतन आयोगाची स्थापना कधी होणार ? किंवा त्याची कार्यपद्धती कशी असणार? याविषयी केंद्र अद्दाप केंद्र सरकारने कोणताही औपचारिक निर्णय दिलेली नाही. परंतु आता नुकतीच लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि आता लवकरच सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल, अशी आशा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
cotton production: कापूस उत्पादनासाठी खरेदी करा हे ५ वाण आणि मिळवा, एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन !
Bandhkam Kamgar Yojana 2024 : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ५,००० रुपये !
PM Kisan Samman Nidhi Yojana : १७ वा हप्ता कधी मिळणार , त्याआधीच करा ही कामे !