Agriculture Bussines Ideas : शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !

Agriculture Bussines Ideas : शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा ! वाचा इथे..

नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. मंडळी तुम्ही सुद्धा शेती सोबत काहीतरी जोडधंदा करायच्या विचारात आहात ? तर आजचा हा लेख तुमच्या साठी नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण या लेखात आपण अशाच काही शेती सोबत करता येणाऱ्या जोडधंद्याविषयीं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेळीपालन

Agriculture Bussines Ideas
Agriculture Bussines Ideas

शेळीपालन हा असा व्यवसाय आहे जरी तुम्ही शेतकरी नसाल , तरी हा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त नफा मिळवु शकता, तसेंच हा व्यवसाय शेतीसोबत अगदी सहजरीत्या करता येतो. आता हा धंदा कसा करायचा तर , सुरुवातीला तुम्ही 2 शेळ्या विकत हा व्यवसाय सुरु करू शकता , आणि दरवेळी चांगल्या निवडक शेळ्या ठेऊन बाकीच्या विकू शकता. तसेंच शेतीसाठी लागणारे लेंडीखत देखील यातून काढता येते.जे की चांगल्या किमतीत विकले जाऊ शकते. शेतातून निघणारे अतिरिक्त गवत , गाईसाठी असलेला मका, तुरीचे भूस , उस कुट्टी, कांद्याची पात हे तुम्ही चारा म्हणून देऊ शकता . जे की तुमच्या शेतात सहज उपलब्ध होतील.(Agriculture Bussines Ideas)

कोंबडी पालन

Agriculture Bussines Ideas
Agriculture Bussines Ideas

हा जोडधंदा करण्यासाठी सुरुवातीला सहा हजार रुपये खर्च करून एक पिंजरा व 3,000 रुपयाच्या 10 कोंबड्या जरी आणल्या. तरी त्यातून दररोज 6 ते 7 अंडी मिळतात आणि अंडी 10 रुपयाने विकता येतात. शिवाय घरात देखील खाण्यासाठी होतात. तसेंच यांचा दुग्धव्यवसायामध्ये सुद्धा फायदा होतो , तो असा की गोठ्यातील गोचीड, किटक खाऊन स्वच्छता वाढते. आता कोंबड्यांना लागणारा चारा काय तर, घास, ऊस कुट्टी , रेशन मधून मिळणारे गहू , तांदूळ यासारख्या गोष्टी वापरता येतात.(Agriculture Bussines Ideas)

दुग्धव्यवसाय आणी गायपालन 

Agriculture Bussines Ideas
Agriculture Bussines Ideas

हा व्यवसाय देखील भरपूर नफा मिळवून देणारा आहे. जो की आपल्याला 2 प्रकारे करता येऊ शकतो . भाकड, गावरान गाई तर काहीजण लहान वासरे घेऊन मोठी करतात. आणि गाई आणून प्रेग्नंट करून चांगल्या किंमतीत विकतात. शिवाय यातून करता येणारा दुग्धव्यवसाय हा देखील एक चांगला पर्याय आहे.(Agriculture Bussines Ideas)

तर मंडळी ही माहिती आवडल्यास पुढे आपल्या शेतकरी मित्रां पर्यंत नक्की पोहचवा आणि अशाच नवनवीन शेती विषयक माहिती साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा…    whatsapp

हेही वाचा  : Kapus Soyabin anudan arj : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, असा करा अर्ज !

Maha Dbt Cotton Picking Bags : 100% अनुदानावर मिळणार कापूस वेचणी बॅग ! असा करा अर्ज

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment