Free Education Scheme In Maharashtra : मुलींसाठी मोफत शिक्षण योजना ! इथे करा अर्ज..

Free Education Scheme In Maharashtra :  मुलींना समान शिक्षण मिळावे, व्यावसायिक शिक्षणातील मुलींची संख्या वाढावी. याकरिता राज्य शासनाने NEP म्हणजेच नवे शैक्षणिक धोरण आखले आहे. या धोरणाद्वारे मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Free Education Scheme In Maharashtra
Free Education Scheme In Maharashtra

त्यामुळेच आता कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना या निर्णयामुळे मोठी संधी उपलब्ध होते आहे.(Free Education Scheme In Maharashtra )

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख अथवा त्याहीपेक्षा कमी आहे , अशा पालकांच्या मुलींना पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महाराष्ट्र सरकारद्वारे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेल्पलाईन नंबर जारी (Free Education Scheme In Maharashtra

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थिनींना योजने संदर्भात कोणत्याही प्रकाराची समस्या येत असल्यास त्याकरिता उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्प डेस्क देखील सुरू केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना अगदी सहजरित्या योजनेचा लाभ घेता येईल. जारी करण्यात आलेला हेल्पलाईन नंबर खालील प्रमाणे आहे.
0796134440
07969134441

http://helpdesk.maharashtracet.org

वरील हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यरत आहे. काही अडचण आल्यास या हेल्पलाईनचा उपयोग नक्की करा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या द्वारे करण्यात आले आहे.(Free Education Scheme In Maharashtra ))

कोणत्या शिक्षण विभागात मिळणार मोफत शिक्षण ?

राज्यातील शासकीय महाविद्यालये,

शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये,

अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये

तंत्रनिकेतने

सार्वजनिक विद्यापिठे

शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून)

यासोबतच सार्वजनिक विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना या योजनेतून वार्षिक शैक्षणिक तसेंच परीक्षा शुल्क १००% म्हणजेच अगदी मोफत करण्यात आलेले आहे.(Free Education Scheme In Maharashtra)

चालू वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आणि त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींनी व चालू शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या पात्र मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले आहेत, अशा मुलींन भरलेले पैसे परत करण्यात येतील. याकरिता पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंकेचे खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक असेल.

मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता :

मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी आणि तिचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.

मोफत शिक्षण योजनेचा लाभ  घेण्यासाठी विद्यार्थी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

मोफत शिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे 

मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.(Free Education Scheme In Maharashtra)

  • विद्यार्थी मुलीचे आधार कार्ड.
  • मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमासाइल प्रमाणपत्र.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शवनारे प्रमाणपत्र/ दाखला.
  • शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC प्रमाणपत्र
  • मागील वर्षाचे मार्कशीट.

आवश्यक कागदपत्रे हे जून महिन्याच्या आधीच जमा करून ठेवल्याने तुमच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार नाही. तसेच वरील कागदपत्रे हि मूळप्रत सह झेरोक्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

मोफत शिक्षण योजनेसाठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया :

मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आणि हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  महाराष्ट्र सरकारद्वारे ऑनलाईन पोर्टल देखील सुरु करण्यात आले आहे. तर या योजनेकरिता जास्तीत जास्त पात्र मुलींनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे, आवाहन शासनाकडून देण्यात आले आहे. 

सदर योजनेकरिता महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. जेणेकरून मुलींना अर्ज करण्यास अडचण येणार नाही,  त्या पोर्टलवर जाऊन सगळी माहिती व्यवस्थित वाचून अर्ज सबमिट करता येणार आहे.

महाडीबीटी पोर्टलची लिंक पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. यावर क्लीक करून अर्ज करावा लागणार आहे.

 https://mahadbt.maharashtra.gov.in/

तर मंडळी अशा प्रकारे ही मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणासाठीची योजना आखण्यात आली आहे. या लेखात आम्ही योजने बद्दलच्या बऱ्याच बाबी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा लेख गरजू विद्यार्थी मुलींपर्यंत नक्की पोहचवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट साठी प्रभात मराठीच्या  व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

उच्च शिक्षण संचालनाकरिता
https://dhepune.gov.in

तंत्र शिक्षण संचालनाकरिता
https://www.dtemaharashtra.gov.in

कला शिक्षण संचालनाकरिता
https://doa.maharashtra. gov.in

(या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.)

https://mahadbt.maharashtra.gov. in या पोर्टलवरुन सदर योजनेस अर्ज करता येणार आहे.

शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे. तसेंच मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा करण्यात येईल. असे मंत्री श्री.पाटील यांच्या द्वारे सांगण्यात आले आहे.

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..chat.whatsapp.कॉम

हेही वाचा: Ladki Gruhasevika Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता राज्यसरकारची लाडकी गृहसेविका योजना !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment