Award For Farmers In India : नमस्कार मंडळी प्रभातमराठीवर आपले सहर्ष स्वागत! तुम्हाला माहीत आहे का की दरवर्षी राज्यात शेती व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा त्या संस्थेला शासनाच्या वतीने काही पुरस्कार देण्यात येतात. त्या सर्व पुरस्कारांविषयी आजच्या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा.
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार
हा पुरस्कार सन १९८४-८५ पासून सुरु झाला आहे. कृषी, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, ग्रामीण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतकऱ्यांचा विकास इत्यादी संलग्नक्षेत्रात अव्दितीय कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी आठ शेतकरी बांधवाना किंवा संस्थाना कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुपये २ लाख रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक अशा प्रकारे सत्कार करण्यात येतो. सन २०१९ च्या अखेरीस देण्यात आलेले एकूण पुरस्कारांची संख्या ही २९२ आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार
हा पुरस्कार २०००-२००१ या वर्षापासुन सुरु झाला आहे. कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कोणत्याही एका शेतकरी बांधवास अथवा संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन्मानित केले जाते. ३ लाख रुपयांचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक देऊन सत्कार करण्यात येतो.
जिजामाता कृषीभूषण पुरस्कार
हा पुरस्कार सुरु सन १९९५ सुरु झाला आहे. राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होणारी प्रगती आणि या प्रगती मध्ये म्हणजेच उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे. शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला नेहमीच पुढे येत असतात. यासोबतच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा आणि अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी याउद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत या पुरस्काराची सुरुवात झाली आहे. या पुरस्कारा मार्फत रुपये 2 लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व पतीसह सत्कार करण्यात येतो.(Award For Farmers In India)
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार
हा पुरस्कार १९९४ पासून सुरु झाला आहे. जे शेतकरी आपल्या कृषीज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील अन्य शेतकरी बांधवाना देखील देत असतील तसेंच शेती उत्पादन वाढविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करत असतील, अशा शेतकऱ्यांना/व्यक्तींना/संस्थांना, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळशेती इत्यादीमधील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत असणाऱ्या व्यक्ती तसेच खेड्यांमधून परसबाग वृध्दींगत करणाऱ्या महिला, कृषी विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारा मार्फत रुपये 1 लाख 20 हजार रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक असा सत्कार करण्यात येतो.(Award For Farmers In India)
कृषीभूषण पुरस्कार ( सेंद्रिय शेती विषयक )
हा पुरस्कार २००९-१० या कालावधीत सुरु झाला आहे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या आणि उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतूने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत अशा शेतकऱ्यांना या पुरस्कारा मार्फत सन्मानित करण्यात येते. यामध्ये 2 लाख रुपये रोख रक्कम, सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह व सपत्नीक सत्काराने गौरविण्यात येते.
युवा शेतकरी पुरस्कार
Award For Farmers In India
हा पुरस्कार युवा शेतकऱ्यांच्या शेतीतिल उत्कृष्ट कामगिरी बद्दल देण्यात येतो . या पुरस्काराची सुरुवात ही २०२० पासून झाली असून, या मध्ये वय वर्ष १८ ते ४० या युवा तरुणांना प्रदान केला जातो. यामध्ये 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम, पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.(Award For Farmers In India)
तर मंडळी तुम्ही सुद्धा कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करित असाल , आणि वरील पुरस्कार बहाल करण्यासाठी इच्छुक असाल तर वरील पैकी पुरस्काराचे प्रस्ताव सादर करण्याकरिता आपल्या गावातील नजिकच्या तालुका कृषी कार्यालयाला संपर्क साधा.(Award For Farmers In India)
तर मंडळी ही माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा. आणि असेच शेती विषयक महत्त्वपूर्ण लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..