krushi pradarshan : या जिल्ह्यात भरणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन !
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन राज्यातील शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञाविषयी माहिती मिळावी तसेंच शेतीतील उत्पादन वाढवता यावे यासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात.
अशातच राज्याच्या कृषी विभागांतर्गत बीड जिल्ह्यातील परळी येथे भव्य असे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.(krushi pradarshan)
या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन २१ ऑगस्ट दुपारी १२ वाजता केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेंच उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे.
यासोबतच हे कृषि प्रदर्शन सलग पाच दिवस चालणार आहे. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानासह विविध कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती देण्यात येणार आहे.
तसेच आपल्या कृषी क्षेत्रातील विविध उत्पादनांची खरेदी देखील या प्रदर्शनात करता येणार आहे. कृषी विद्यापीठाद्वारे विकसित करण्यात आलेले नवीन तंत्र, पिकांचे वाण अशा बऱ्यांच विषयांची माहिती देखील दिली जाणार आहे. कृषीप्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर शेतीसाठीच्या राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सुद्धा सांगण्यात येणार आहे. ड्रोन द्वारे पिकांची फवारणी करणे विविध आधुनिक यंत्रसामुग्री, तज्ञांची चर्चासत्र अशी शेतीकरिता लागणारी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात सहभागी झाले पाहिजे.