Surya Ghar Yojana Maharashtra : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, असा करता येणार अर्ज, वाचा सविस्तर माहिती इथे !
केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेतून 300 युनिट वीज अगदी मोफत मिळणार आहे. एकंदरीत देशातील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकार कडून ७५,०२१ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या द्वारे सांगण्यात आले आहे.
या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील शिक्कामोर्तब केला आहे.(Surya Ghar Yojana Maharashtra)
‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ असे या योजनेचे नाव असून योजने अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे .
छतावर सौरऊर्जा संयंत्रे म्हणजेच रूफ टॉप सोलर बसवण्याकरिता ही योजना आखण्यात आली आहेन.
प्रधानमंत्री मोफत सूर्यघर वीज योजना म्हणजे नेमके काय ?(Surya Ghar Yojana Maharashtra)
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचा 15 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाला होता.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजने अंतर्गत लाभार्थ्यांना सौर पॅनेल खरेदी करण्या करिता शासनाकडून योग्य प्रकारे अनुदान देण्यात येते आहे.(Surya Ghar Yojana Maharashtra)
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 2024 या योजनेच्या माध्यमातून देश भरातील सुमारे 1 कोटी कुटुंबियांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
पीएम सूर्य घर योजनेतंर्गत अनुदान किती देण्यात येते ?
सदर योजने अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला आपल्या घराच्या छतावर विजेसाठी सौर पॅनेल विकत घ्यायचे असल्यास तर, त्यावर शासना द्वारे 1 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 30,000 /- रुपये तर 2 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 60,000/- रुपये तसेंच 3 किलोवॅट सौर पॅनेलवर जास्तीत जास्त 78,000/- रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे सौर पॅनल बसवण्याच्या विचारात असणाऱ्या मंडळींनी या योजनेचा नक्की विचार केला पाहिजे.
पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
ज्या अर्जदार कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीवर नाही, अशा व्यक्तीला योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
सर्व जातीचे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
अर्जदाराकडे आपले वीज बिल कनेक्शन असणे आवश्यक आहे.
योजनेकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे ;
Surya Ghar Yojana Maharashtra
- आधार कार्ड,
- रेशन कार्ड,
- बँकेचे पासबुक,
- मोबाईल क्रमांक,
- सहा महिन्याचे वीज बिल,
- पत्याचा पुरावा.
प्रधानमंत्री सूर्य घर योजने करिता असा करा अर्ज ;
Surya Ghar Yojana Maharashtra
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम
https://pmsuryaghar.gov.in/या संकेतस्थळावर जावे.
संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला याठिकाणी डावीकडे तीन पर्याय दिसतील.
१) Apply For Rooftop Solar
२) Subsidy Structure
३)Empanelled Vendors.
परंतु अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिल्या पर्यायावर म्हणजेच Apply For Rooftop Solar या पर्यायवर क्लिक करावे.
आता पुन्हा तुमच्या समोर दोन पर्याय दिसून येतील, जसे की (Register Here,
Login Here) जर तुम्ही याठिकाणी नव्याने लॉगिन करत असाल तर, Register Here या पर्यायावर क्लिक करावे. रजिस्टर करण्यासाठी विचारलेली माहिती व्यवस्थतीत भरून Register करून घ्यावे.
आता ‘ Register’ केल्यानंतर लॉगीन करावे. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर ‘Apply For Rooftop Solar’ अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल त्याखालील ऑप्शन वर म्हणजेच proceed बटनावर क्लीक करावे.
आता ‘proceed’ केल्याच्यानंतर तुमच्या समोर एक नवीन फॉर्म दिसेल, इथे तुम्हाला तुमची म्हणजेच अर्जदाराची विचारण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
त्या माहिती मध्येच तुम्हाला किती kilowatt ची आवश्यकता भासणार आहे ते या उजव्या बाजूच्या रकान्यामध्ये भरा. ज्या ठिकाणी या योजनेचा लाभ घायचा आहे ते ठिकाण म्हणजेच location निवडावे.
आता आणखी एक शेवटची स्टेप असेल त्या मध्ये तुम्हाला आपले ६ महिने जुने असलेले वीज बिल उपलोड करायचे आहे.
सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्या समोर दिसत असणाऱ्या ‘ final submission’ या बटनावर क्लिक करावे. (खालील बटणवर क्लिक करून तुम्ही दिलेली माहिती एडिट सुद्धा करू शकता.)
त्यानंतर तुम्हाला आपल्या बँकेच्या डिटेल्स भरून ‘ submit’ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल.
त्यानंतर DISCOM मध्ये नोंदणी असलेल्या कोणत्याही वेंडरकरुन प्लॅन्ट इंस्टॉल करता येईल.
सोलर पॅनल इंस्टॉलेशन तुम्हाला प्लँट डिटेल देऊन नेट मीटरसाठी अर्ज करावा लागतो.
……………………………..
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..
हेही वाचा; Magel Tyala solar Pump Yojana Online Registration : मागेल त्याला सोलर पंप योजना, असा करा ऑनलाईन अर्ज
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?