Namo Shetkari Yojana 4th Installment Date : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी जमा होणार , शेतकऱ्यांच्या खात्यात !

Namo Shetkari Yojana 4th Installment Date ; शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या योजनेला मिळाली मान्यता !
Namo Shetkari Yojana 4th Installment Date
Namo Shetkari Yojana 4th Installment Date

पीएम किसान योजनेच्या धरतीवर 30 मे 2023 रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची घोषणा ही मागील वर्षाच्या म्हणजेच 2023 च्या अर्थसंकल्पा मध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार मागील वर्षात 3 तर यंदा चौथा हप्ता देण्यात येणार आहे . या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना वर्षभरात 3 हप्त्यात प्रति हप्ता म्हणजेच रुपये 2000 म्हणजेच वर्षाला एकूण 6000 रुपये देण्यात येतात.

योजना जाहीर झाल्या पासून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 3 हप्ते आत्त्ता पर्यंत देण्यात आले आहेत. योजनेचा तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 देण्यात आला होता.त्यानंतर चौथा हप्ता जुलै 2024 रोजी जमा होण्याची शक्यता होती, मात्र अजूनही या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाहीये. त्यामुळे राज्यसरकारने नमो शेतकरी योजना बंद केलीये , अशा अफ़वांना उदान आले आहे. परंतु खरंच ही योजना बंद करण्यात आली आहे का ? तर नाही ! ही योजना शासन अजूनही राबवतंय , मग चौथा हप्ता का नाही आला ? आणि कधी येणार आहे ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर, चला जाणून घेऊयात या योजनेच्या चौथ्या हप्त्या बद्दल ही खास अपडेट ! (Namo Shetkari Yojana 4th Installment Date)

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम उभे आहे.आणि राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकरिता ही योजना शासन राबवते आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मागील दोन महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची राज्यातील समस्त शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि तसे पाहायला गेले तर, आत्ता पर्यंत या योजनेद्वारे एकूण तीन हप्त्या मध्ये  5 हजार 304 कोटी 95 लाख रुपये राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे सांगण्यात आलेले आहे.

(Namo Shetkari Yojana 4th Installment Date)

13 ऑगस्ट 2024 पर्यंत 91.93 लाख शेतकऱी या योजनेसाठी पात्र ठरल्याचे राज्यसरकार द्वारे सांगण्यात आले होते. परंतु पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्यासाठी राज्यातील 91 लाख 44 हजार 447 शेतकरी पात्र ठरले होते, त्यापैकी 90 लाख 88 हजार 42 शेतकऱ्यांना या हप्त्याचा निधी देण्यात आला होता. त्यामुळे तेवढ्याच म्हणजेच 90 लाख 88 हजार 42 शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

यासोबतच यापूर्वी म्हणजे योजनेच्या पहिल्या हप्त्यात 85 लाख 60 हजार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता.त्या मध्य्ये आता 5 लाख शेतकरी बांधवांची वाढ ही राज्य सरकार द्वारे करण्यात आलेली आहे.

काय आहे नमो महासम्मान निधी योजना

सदर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 6,000/- रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला होता. आणि या योजने अंतर्गत केंद्र व राज्य मिळून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी एकूण 12,000/- रुपयांचा निधी मिळणार आहे.

जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळं शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ज्या बँक खात्याचा तपशील दिलेला आहे, तोच यासाठी आवश्यक असणार आहे. द्यावा लागणार आहे. याची नोंद घ्यावी.

महासम्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार ?

(Namo Shetkari Yojana 4th Installment Date)

महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार असा अनेकांना प्रश्न पडत आहे. परंतु आम्ही मिळवलेल्या माहितीनुसार , राज्य वित्त विभागा कडून आता चौथ्या हप्त्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता त्यांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही, म्हणजेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येणाऱ्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. फार-फार तर येत्या शुक्रवार पर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे.

केवळ एकाच हप्त्याच्या वितरणाला वित्त विभागा कडून समोवारी म्हणजेच 19 तारखेला परवानगी दिल्याचे समजते. तसेंच योजनेचा पाचवा हप्ता हा पुढच्या महिन्यात देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेसोबतच इतर अनेक योजना शासन आखत असल्यामुळे नमो शेतकरी योजनचा निधी पुढे ढकलण्यात आली होता. परंतु आता येत्या 2 दिवसांतच चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.(Namo Shetkari Yojana 4th Installment Date)

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा…  whatsapp.com/

हेही वाचा; Surya Ghar Yojana Maharashtra : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्य घर योजना , असा करा अर्ज !

Saur krushi vahini Yojana 2.0: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

Aamcha Ladka Shetkari Yojana ; आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment