Mukhyamatri Vayoshri Yojana Online Registration : मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी अर्ज कसा करावा ? वाचा इथे…
राज्यशासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला भरगोस प्रतिसादानंतर शासनाने आपला मोर्चा नव्या योजनेकडे म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजने कडे वळवला आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणारी ही योजना राज्यातील केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच असणार आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना एक प्रकारे ही आनंदाची बातमी आहे. या योजने द्वारे पात्र लाभार्थी जेष्ठ नागरिकास वर्षाला तीन हजार रूपये दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने प्रमाणेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेला आता गती मिळणार आहे. सदर योजना ही जिल्हाधिकारी तसेंच पालिका आयुक्तांमार्फत राबवण्यात येणार आहे.
Mukhyamatri Vayoshri Yojana Online Registration
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वयवर्ष ६५ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात तसेंच सामान्य स्थितीत तसेंच त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करता यावी यासाठी आवश्यक साहित्य सुद्धा दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेंतर्गत ३ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची वैशिष्ट्ये:
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतगर्त वृद्ध नागरिकांकरिता विविध फायदे प्रदान केले जाणार आहेत. वयोश्री योजनेमुळे जेष्ठ नागरिकांना दैनंदिन खर्चांची पूर्तता करणे सोयीचे होणार आहे.
Mukhyamatri Vayoshri Yojana Online Registration
वृद्ध व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून औषधें, वैद्यकीय वस्तू यासोबतच वैद्यकीय तपासणीसाठी आर्थिक मदत करण्याय येणार आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना ही योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे उद्दिष्टे :
तस पाहायला गेलं तर राज्यशासनाद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा ही ८ जुलै २०२४ रोजी केली होती. परंतु आता लाडकी बहिण योजने नंतर , वयोश्री योजने कडे शासन लक्ष देताना दसते आहे.
वयोश्री योजने मुख्य उद्दिष्ट , राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य पुरवणे हे आहे.
वृद्ध व्यक्तींना त्यांच्या शेवटच्या काळात होणारा आर्थिक तणाव टाळता यावा तसेंच त्यांच्या जीवनशैलीत योग्यती सुधारणा व्हावी या अनुषंगाने ही योजना आखण्यात आली आहे.(Mukhyamatri Vayoshri Yojana Online Registration)
योजनेद्वारे दिला जाणारा लाभ :
मुख्यमंत्री वयोश्री योजने द्वारे पात्र जेष्ठ नागरिकांना 3000/- रुपये देऊ केले जाणार आहेत.
दिली जाणारी रक्कम ही खालील प्रकारे देण्यात येण्याची शक्यता आहे किंवा याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांना या रकमेचे वितरण होणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्या नागरिकांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहेत अशा नागरिकांना अनेक शारीरिक आजार किंवा अनेक त्रासांना सामोरे जावे लागत असते. जसे की,प्रौढ व्यक्तींमध्ये ऐकू न येणे, कमी दिसणे, शुगर, बीपी,गुडघ्यांचा त्रास,कमरेचा त्रास. अशा विविध आजारांना किंवा त्रासांना त्यांना सामोरे जावे लागत असते. आणि असे बरेच नागरिक आहेत ज्यांना त्यांच्या उपचाराकरिता पैसे नसतात. त्यांची ही अडचण शासनाने लक्षात घेऊन अशा नागरिकांना आर्थिक मदत म्हणून खालील उपकरणे विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.(Mukhyamatri Vayoshri Yojana Online Registration)
- शुगर आणि बी पी तपासणीचे यंत्र,
- श्रवण यंत्र,
- लंबर व गुडघा बेल्ट,
- चष्मा
- सर्वाइकल कॉलर
- ट्रायपॉड,
- स्टिक व्हील चेअर.
अशी विविध प्रकारची उपकरणे या योजने अंतर्गत राज्यातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना पुरवली जाणार आहेत.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
Mukhyamatri Vayoshri Yojana Online Registration
- अर्जदारचे आधारकार्ड,
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो,
- मतदान कार्ड,
- राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले पासबूक(आधार लिंक असावे),
- स्वयं घोषणापत्र,
- शाळा सोडल्याचा दाखला,
- वार्षिक उत्पन्न 2 लाखापर्यंत असावे.
- वीज बिल,
- रेशन कार्ड (बी.पी.एल.धारक)
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार ??
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री वयोश्री योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून लवकरच एक वेबसाइट सुरू करण्यात येणार आहे ज्यावर तुम्ही घरबसल्या लाडक्या बहीण योजने प्रमाणे अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज कसा करायचा या बद्दल आम्ही प्रभात मराठी वर लेख प्रसिद्ध करू, त्याकरिता तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
असा करा ऑफलाईन अर्ज
मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी अद्द्याप तरी कुठलेच ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलेले नाहीये , त्यामुळे तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
खाली देण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्या मध्ये विचारलेली अर्जदाराची सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी. आणि वरील सर्व कागदपत्रे फॉर्म म्हणजेच अर्जासोबत जोडावी. आणि आपल्या भागातील सह्हायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन आपला अर्ज सबमिट करायचा आहे. किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील एकत्रित पणे अर्ज केले जात असतील , तर तिथूनही तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जाची Pdf: – येथे क्लीक करा >>>>>>>>
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा !