Helath Insurance policy : तुम्ही आपल्या वृद्ध आई वडिलांचा आरोग्य विमा काढलाय का ? आरोग्य विमा कसा ठरतो फायदेशीर…

Helath Insurance policy :
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमके काय ?

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी की ज्या द्वारे आपल्याला अपघात, आजारपण अथवा दुखापतीमुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देण्यात येते. यामध्ये एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीकरिता मासिक किंवा वार्षिक प्रीमियम पेमेंट विरूद्ध अशा पॉलिसीचा लाभ घेता येतो.(Helath Insurance policy)

या कालावधी मध्ये विमाधारकाचा अपघात किंवा गंभीर आजारपण आल्यास त्यावर उपचाराच्या उद्देशाने होणारा सर्व खर्च विमा पुरवठादाराकडून करण्यात येतो.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची गरजेची आहे का ?

तसे पाहायला गेले तर, २०१६ पर्यंत, पुरुषांचे आयुर्मान हे ६८.७ वर्षे आणि स्त्रियांचे ७०.२ वर्षे होते. आणि जागतिक सरासरी अनुक्रमे ७० आणि ७५ वर्षे आहे.

२०१७ मध्ये भारतात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे ६१% मृत्यू असंसर्गजन्य रोगांनी झाल्याचे समोर आले होते.

भारतात सुमारे २२४ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते.

तर ही आकडेवारी असे दर्शवते की संभाव्य वैद्यकीय जटिलता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात विकसित होऊ शकतात, आणि त्यावरील उपचारांकरिता संबंधित खर्चाचीही गरज निर्माण होऊ शकते.

तुम्ही आपल्या वृद्ध आई वडिलांचा आरोग्य विमा काढलाय का ? आरोग्य विमा कसा ठरतो फायदेशीर जाणून घेऊयात आजच्या लेखात..
Helath Insurance policy
Helath Insurance policy

तर सध्या आरोग्य विमा पॉलिसी चे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ज्या द्वारे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्य विमा पॉलिसी घेता येते. आणि एनवेळी येणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून दिलासा मिळवता येतो.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना विविध प्रकारचे आजार उद्भवतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब , डायबिटीस असे अनेक रोग आहेत. ज्याचे बळी अगदी कमी वयातले तरुण देखील होत आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी तर घेतलीच पाहिजे पण यांचबरोबर भविष्यात उद्भवणाऱ्या आजराचे निराकरन करण्यासाठी नियोजन देखील केलेच पाहिजे.(Helath Insurance policy)

जर आपल्या घरात वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप अतिशय गरजेचे असते कारण बऱ्याचदा वाढत्या वया मुळे अनेक आजारांचे प्रादुर्भाव जेष्ठ त्यांना होत असतात. आणि त्यामुळे सतत दवाखान्याची वाट धरावी लागते. आणि त्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा.

वाढत्या महागाईच्या काळात सर्वच गोष्टींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा देखील अत्यंत महाग झाल्याचे पाहायला मिळते. आता अशा खर्चापासून वाचायचे असेल तर आरोग्य विमा काढल्याशिवाय पर्याय नाही.

ज्या प्रमाणे तरुण वर्गासाठी आरोग्य विमा फायदेशीर आहे तासाच तो आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींसाठी देखील फायदेशीर आहे.(Helath Insurance policy)

तर आजच्या लेखात आपण असे काही आरोग्य विम्याचे पर्याय बघणार आहोत. जे वृद्धांसाठी नक्कीच फायदेशीर आहेत.ज्याचा तुम्ही नक्की विचार करायला हवा.

स्टार हेल्थ ॲशुअर इन्शुरन्स पॉलिसी

Helath Insurance policy

स्टार हेल्थ ॲशुअर इन्शुरन्स ही एक उत्तम आरोग्य विमा पॉलिसी आहे. यामध्ये ६६ वर्षाचे पुरुष आणि 61 वर्षीय महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेंच या अंतर्गत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर दिले जाते.

तर मंडळी ५ लाख रुपयांच्या या प्लॅन करिता तुम्हाला दर महिन्याला ४,६४३ रुपये प्रीमियम भरावे लागते. या प्लॅनमध्ये देशातील जवळपास २८४ कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पॉलिसी अंतर्गत हॉस्पिटलमधील खोलीच्या भाड्याची मर्यादा ही पाच हजार रुपये प्रति दिवस इतकी ठेवण्यात आलेली आहे.(Helath Insurance policy)

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हे देखील अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाची अशी आरोग्य विमा पॉलिसी आहे.
यामध्ये ६६ वर्षाचे पुरुष आणि ६१ वर्षाच्या महिलेला वार्षिक पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळतो.

आणि या ५ लाखाच्या आरोग्य विमा पॉलिसीकरिता तुम्हाला महिन्याला ४,८९६ रुपयांचा प्रीमियम भरणे गरजेचे असते. व या पॉलिसीच्या माध्यमातून संपूर्ण देशात २७० कॅशलेस दवाखान्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणी या हॉस्पिटलच्या खोलीच्या भाड्यांना देखील कुठल्याही प्रकारची मर्यादा लावलेली नाहीये.

केअर सुप्रीम( सीनियर सिटीजन)-

केअर सुप्रीम या आरोग्य विम्याअंतर्गत ६६ वर्षाचे पुरुष आणि ६१ वर्षांच्या महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विमा अंतर्गत ७ लाख रुपयांचे वार्षिक विमा कव्हर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर प्लानमध्ये दरमहा ३,८५० रुपये प्रीमियम भरावा लागतो. तसेंच या योजने अंतर्गत २७९ कॅशलेस हॉस्पिटलचा समावेश केलेला आहे. शिवाय या पॉलिसीमध्ये देखील वरील पॉलिसी प्रमाणे सिंगल प्रायव्हेट एसी रूम घेता येतो.

अशाच माहिती करिता प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा..  येथे क्लिक करा   .

हेही वाचा:- मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी अर्ज कसा करावा? वाचा इथे

5 वर्षांत 12 लाख रुपयांचे व्याज देणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का ?

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment