Lakhpati Didi Yojana Maharashtra ; लखपती दीदी योजना म्हणजे काय ? वाचा योजने बद्दल सविस्तर माहिती इथे..
राज्यशासनाद्वारे राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ७ राज्यांत महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत असतानाच आता केंद्र सरकारच्या लखपती दीदी या योजनेची चर्चा होताना दिसत आहे . आता या योजने द्वारे महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
लखपती दीदी योजनेकरिता ही असणार पात्रता
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काही पात्रतेच्या अटी असणार आहेत. ज्या की, प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात वेगवेगळ्या असणार आहेत. तर पात्रतेचे सामान्य निकष पुढीलप्रमाणे देण्यात आले आहेत.
लखपती दीदी योजना असे या योजनेचे शीर्षक आहे. याचा अर्थ ही योजना फक्त महिलांसाठीच असणार आहे. त्यामुळे योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात.
सदर योजनेसाठी अर्जदार महिला ही संबंधित राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे .
सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 3,00,000 रुपयांपेक्षा(तीन लाखांपेक्षा) कमी असायला हवे.
अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 50 वयवर्ष यादरम्यान असावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा :
लखपती दीदी योजनेची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केली होती.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याकरिता तसेंच त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ही योजना आखली गेली आहे. त्यामुळे गरजू महिलांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
योजनेचा उद्देश काय ?
महिलांना आर्थिकदृष्टय़ा पाठबळ मिळावे याकरिता केंद्र आणि राज्य सरकार द्वारे अनेक योजना राबवल्या जातात. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला देखील राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व योजनांचा उद्देश महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी हाच असतो. आणि यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील होताना दिसतात.
Lakhpati Didi Yojana Maharashtra
याचदरम्यान आता सरकारकडून ‘लखपती दीदी’ ही योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षीच ही योजना सुरु केली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे.
योजनेतुन मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत.
Lakhpati Didi Yojana Maharashtra
बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही प्रमुख उद्देश या योजनेमागे आहे.
लखपती दीदी या योजनेच्या मदतीनेच महिलांना कौशल्य विकासाकरिता योग्य प्रशिक्षण देण्यात येते. यासोबतच स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी या महिलांना १ लाख रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येते. तर योजनेच्या माध्यमातून तब्ब्ल ३ कोटी महिलांना जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश असणार आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra
काय असणार योजनेसाठी अट ?
योजनेस पात्र ठरण्यासाठी म्हणजेच लाभ घेण्यासाठी शासनाने काही अटी शर्ती लावल्या आहेत. जसे की , सदर योजनेसाठी अर्ज त्याच महिला करू शकणार आहेत ज्यांच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसेल. शिवाय ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षाही कमी आहे, अशा महिला अर्ज करू शकतात. अशा बऱ्याच अटी, नियम असणार आहेत.(Lakhpati Didi Yojana Maharashtra)
अर्ज कसा करावा लागणार ?
केंद्र शासनाच्या ‘लखपती दीदी’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांना आपल्या बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागणार आहे. तसेंच केलेल्या नियोजनाचा म्हणजेच या उद्योगाचा संपूर्ण आराखडा सरकारला पाठवला जाईल. त्यानंतर या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या पाठवलेल्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. पुढे सर्व अटींची पूर्तता होत असल्यास महिलांना योजने अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल.
Lakhpati Didi Yojana Maharashtra या योजने बद्दलची आणखी सविस्तर वाचायचे असल्यास प्रभात मराठीवर आणखी लेख प्रसिद्ध केला जाईल. तोपर्यंत तुम्ही प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा !
प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपचे सदस्य व्हा. :
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?