Saur krushi vahini Yojana 2.0: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

Saur krushi vahini Yojana 2.0 : शेतकऱ्यांनो आता दिवसा अखंडित वीज मिळणार ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

Saur krushi vahini Yojana 2.0
Saur krushi vahini Yojana 2.0
शेतकऱ्यांची मागणी होणार ; पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०

तसें पाहायला गेले तर, शेतकऱ्यांना चक्रीय पध्दतीने म्हणजेच दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जातो. आणि अशाप्रकारचा वीजपुरवठा होत असल्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते.

Saur krushi vahini Yojana 2.0

अनेकदा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी देखील शेतामध्ये सिंचन करण्यासाठी जावे लागते. आणि अशावेळी वन्य प्राणी, साप चावणे, अशा प्रकारच्या धोक्यांची बरीच शक्यता असते. त्यामुळेच अशा अडचणी, समस्या सोडविण्याकरिता शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होताना दिसत होती.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या कृषीपंपांना आता दिवसा देखील वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Saur krushi vahini Yojana 2.0)

दिवसा अखंडित विज देण्याची घोषणा

दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार आणि व्याप्ती वाढविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. यावेळी मंत्री मंडळाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे होते.(Saur krushi vahini Yojana 2.0)

इतक्या मेगावॉट ला मिळाली मान्यता 

मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 या मिशन मोडवरील या योजनेच्या माध्यमातून आता येणाऱ्या वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेंच ९००० मेगावॅट अधिक उर्वरीत ७००० मेगावॅट असे १६,००० मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मितीच्या उद्दिष्टांना मान्यता देण्यात आली आहे.(Saur krushi vahini Yojana 2.0)

मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 या मिशनमुळे राज्यातील एकूण १००% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या अंतर्गत देण्यात येणारे प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य सुरु ठेवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकी मध्ये मान्यता दिली गेली  आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीनवनवीन  2.0 मध्ये केले जाणार आहे.(Saur krushi vahini Yojana 2.0)

योजनेसाठी इतका निधी देण्यात येणार 

या योजने अंतर्गत कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा तर केला जाणार आहेच, यासोबतच वीज उपकेंद्राची देखभाल व सुधारणा, प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य, ग्रामपंचायतींना प्रोत्साहन आणि विशेष म्हणजे Revolving Fund या आर्थिक प्रोत्साहना करिता सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीकरिता २ हजार ८९१ कोटी एवढा अतिरिक्त निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सन २०२४-२०२५ या वर्षीच्या ७०२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या तरतूदीला मान्यता दिली गेली आहे.

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सोबतच अनेक योजनांचे बार शासन उडवताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ ही योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे.

(प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण नवनवीन योजनांची माहिती घेत असतो, आणि त्याकरिता प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा) 

या योजनेद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलांचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यामुळे राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आणि याकरिता १४ हजार ७६१ कोटी रुपये वार्षिक अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजने अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणचा सरासरी वीज खरेदीचा दर हा बऱ्यापैकी कमी होताना दिसून येणार आहे. आगामी काळातील कृषी क्षेत्रासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार यातून नक्कीच कमी होणार आहे.

 तर मंडळी ही माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रां पर्यंत नक्की पोहचवा..

आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

  येथे क्लिक करा   whatsapp.

हेही वाचा:Mahadbt favarni pump yojana : औषध फवारणी पंपासाठी अर्ज करताय ? पण वेबसाईट चालत नाही तर, वापरा ही पद्धत !

Lakhpati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी योजना म्हणजे काय ?

Surya Ghar Yojana Maharashtra : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्य घर योजना , असा करा अर्ज !

Ahilyadevi Mahamesh Yojana Online Application 2024 :अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment