Ladki Bahin Yojana 2nd Installment Dateमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता लवकरच येणार बँक खात्यात !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेंच लाडक्या बहिणींना शासनाने रक्षाबंधनाच्या आधीच ओवाळणी म्हणजेच 2 महिन्याचे निधी एकत्र दिले आहेत. परंतु तरी देखील बऱ्याच महिलांना अन्य कारणाने निधी मिळाले नाहीत. तर अशा महिलांना 3 महिन्यांचा एकत्र निधी देण्यात येणार आहे. आणि याच बद्दल आपण आजच्या लेखात सविस्तर आढावा घेणार आहोत.(Ladki Bahin Yojana 2nd Installment Date )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार द्वारे या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात ३,००० रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेचा हा निधी जुलै व ऑगस्ट महिन्यातील दोन स्वरूपाचा आहे. तर आता या योजनेचा दुसरा टप्पा देखील सुरू होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना ४,५०० रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच, दुसऱ्या टप्प्यातील ४,५०० रुपये मिळणार आहेत . आधार सीडिंग न केल्यास, योजनेचा लाभ मिळणार नाही.
दुसऱ्या टप्प्यातील लाभ कधी ?
(Ladki Bahin Yojana 2nd Installment Date )
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याचा निधी ३१ ऑगस्टपासून वितरीत होणार आहेत. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.(Ladki Bahin Yojana 2nd Installment Date)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वाटपाचा कार्यक्रम हा नागपूरमध्ये होणार असून, या कार्यक्रमातून ज्या महिलांनी १ ऑगस्टपासून अर्ज सादर केले आहेत, त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :
सदर योजना ही केवळ महिलांसाठी असल्यामुळे राज्यातील महिला वर्ग या योजनेसाठी पात्र ठरेल.
सदर महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे.
विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
अर्जदार महिलेचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
वयाच्या अटी बद्दल सांगायचे झाल्यास, किमान २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण
असणाऱ्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्जदार महिलेचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
अर्ज करू पाहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा जास्त नसावे याची काळजी घ्या.
माझी लाडकी बहीण योजने साठी लागणारे आधार सीडिंग म्हणजे नेमके काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वाटप झाल्यानंतरही बऱ्याच महिलांनी तक्रार केली ती अशी की, लाडकी बहीण योजनेचा निधी त्यांच्या बँक खात्या मध्ये जमा होत नाहीये. अशा समस्या येत असणाऱ्या महिलांना सर्व प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे लागणार आहे. हे बँक सिडींग स्टेटस कसे तपासायचे याबद्द्लची माहिती खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 : लाभासाठी बँक सिडींग स्टेटस असे चेक करा !
अर्ज प्रक्रिया :
ज्या महिलांनी अजूनही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला नाहीये. अशा महिलांना पुढील प्रमाणे देण्यात आल्याला पद्धती नुसार अर्ज करता येणार आहे.
ज्या महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येत नसेल किंवा यामध्ये काही अडचणी येत असल्यास , अशावेळी त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/ आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे जाऊन ऑनलाइन तसेंच ऑफलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही.
अर्ज भरत्या वेळी या गोष्टी अतिशय काळजी पूर्वक भरणे गरजेचे आहे जसे की, अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक असावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर या बद्दलची सर्व माहिती बरोबर असेल याची खात्री करून घ्यावी.
हेही वाचा: –Lakhpati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी योजना म्हणजे काय ?
तर मंडळी या लेखात आपण बरेच मुद्दे सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा लेख जास्तीत जास्त महिलां पर्यंत पोहचवा.
आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा :-