Battery Favarni Pump Yojana Status Check : फवारणी पंप योजनेच्या अर्जाचा स्टेटस असा तपासता येणार..
नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. शेतीविषयक लेख, योजना आणि नोकरी संदर्भातील आढावा आपण याठिकाणी घेत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण फवारणी पंप अनुदाना बद्दलची खास माहिती घेणार आहोत. (Battery Favarni Pump Yojana Status Check )
फवारणी पंप अनुदान योजना 2024
Battery Favarni Pump Yojana Status Check
महाराष्ट्र राज्य शासना द्वारे राज्यातील शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्याकरिता विविध योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना म्हणजे फवारणी पंप अनुदान योजना 2024.अलीकडेच सुरु झालेल्या या अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या पिकांचे कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणीसाठी १००% अनुदानावर मोफत स्वयंचलित फवारणी पंप उपलब्ध करून दिला जाणार आहे.
2024 म्हणजे याच वर्षीपासून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांना मोफत बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप खरेदी करण्यावर 100% अनुदान दिले जाणार आहे.
फवारणी पंप योजनेच्या अर्जाचा स्टेटस असा तपासा
(Battery Favarni Pump Yojana Status Check )
महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी आपले अर्ज सादर केले आहेत. त्यांना आपल्या अर्जाचा सध्याचा स्टेट्स खालील प्रक्रिये द्वारे बघता येणार आहे.
अर्जाचा स्टेटस पाहण्यासाठी शासनाने जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
http://mahadbt.maharashtra.gov.in
वेबसाईटच्या होम पेजवर येऊन, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लिंकवर क्लिक करा.
आता पुढील पृष्ठावरील लाभार्थी स्थितीच्या पर्यायावर क्लिक करा.
पुन्हा नवीन पृष्ठावर आल्यानंतर आता तुमचा नोंदणी क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा त्यानंतर गेट मोबाइल ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर जो ओटीपी येईल, तो ओटीपी त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि चेक स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करावे.
आता तुमच्या समोर फवारणी पंप अनुदान योजनेच्य अर्जाची स्थिती तपासता येईल.
योजनेचा मुख्य उद्देश :
Battery Favarni Pump Yojana Status Check
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल तसेंच ते लागणाऱ्या खर्चाची बचत करू शकतील.
पेरलेल्या पिकावर कीटकनाशकांची फवारणी करून कीड आणि रोगांपासून पीकांचे संरक्षण होईल.ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.आणि राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल.(Battery Favarni Pump Yojana Status Check )
फवारणी पंप अनुदान योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
या योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना 100% अनुदानावर स्वयंचलित फवारणी पंप मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांवर वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करून आपल्या पिकांचे कीड तसेच रोगांपासून संरक्षण करता येणार आहे.राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवुन आधुनिक तंत्रज्ञानाने खरेदी करण्यास प्रोत्साहन दिले जाणार.
योजनेसाठी पात्रता निकष
फवारणी पंप अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता निकष असणार आहेत.
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांची स्वतःची बागायती जमीन असणे आवश्यक योसोबतच त्या जमिनीत पिकाचे उत्पादन देखील घेतले जावे.
- शेतात वीज जोडणी असावी.
- अर्ज करण्याकरिता शेतकऱ्यांकडे लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जसे की
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- कौटुंबिक रेशन कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- 7/12 वा Utara 8A दस्तऐवज
- बँक पासबुक
- वीज बिल
- पासपोर्ट साइज फोटो
सदर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील संकेतस्थळावर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे.
https://mahadbt.maharashtra.gov.in
त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
आता कृषि यांत्रिकीकरण >> बाबी निवडा येथे क्लिक करून घ्यावे.
मुख्य घटक या पर्यायावर क्लिक करावे >> कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य.
आता तपशिल बाबींवर क्लिक करून, मनुष्यचलीत औजारे हा घटक निवडावा.
त्यानंतर यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करा आणि – पिक संरक्षण औजारे हा पर्याय निवडा.
मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरी संचलीत फवारणी पंप ( गळीतधान्य)/कापूस हा पर्याय निवडा.
अर्ज सादर करावे वर किल्क केल्यानंतर ,पुढील पेज वर ‘अर्जाला प्राधान्य द्या’ या पर्यायावर क्लिक करावे.
आता तुम्हाला पेमेंट चे ऑप्शन येईल जे 20 रुपयांच्या आसपास असेल. काहींना पेमेंट ऑपशन येणार नाही.
त्यानंतर ‘अर्ज सादर करणे’ हा पर्याय निवडावा.आणि अशा प्रकारे तुमचा अर्ज सबमिट होईल.
मंडळी ही माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा, आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..…व्हॉट्सॲप ग्रुप…
Namo Shetkari Yojana 5th Installment Date : नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कधी जमा होणार ?