Ahilyadevi Mahamesh Yojana Online Application 2024 : अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेसाठी ऑनलाईन अर्ज असा करा
तर नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. आपल्याला कल्पना असलेच किंवा नसेलही , आपण या ठिकाणी म्हणजेच प्रभात मराठीच्या माध्यमातुन नवनवीन शासकीय योजना तसेंच शेती आणि नोकरी संदर्भातील काही खास अपडेट सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण अशाच एका महत्त्वपुर्ण योजनेचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा लेख आपल्या गरजूवंत मित्रांना , नातेवाईकांना नक्की पाठवा . आम्ही आशा करतो की हा लेख नक्कीच फायदेशीर ठरु शकेल.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम बनव्याकरिता शासन नेहमीच कार्यरत असते, नवनवीन योजना राबवत असते. शेतकऱ्यांसाठी वीज बिल योजना, महासन्मान निधी योजना असेल, किंवा महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल. सध्या शासन अनेक नवनवीन योजना आणत आहे.दरम्यान अशाच प्रकारची एक महत्त्वपुर्ण योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळा अंतर्गत राबवण्यात येणारी ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024’.(ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
योजना नेमकी काय ?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे विविध प्रकराच्या योजना राबवण्यात येतात. खालील प्रमाणे देण्यात आलेल्या योजनांच्या प्रकारामध्ये एकूण १८ प्रकारच्या योजना असणार आहेत. ( या १८ योजना कोणत्या आणि त्यांचे निकष समजून घेण्यासाठी तुम्ही शासन निर्णय वाचु शकता )(ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजना,
- मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजना,
- मेंढी शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना,
- कुक्कुट पक्षांच्या खरेदी तसेंच संगोपनासाठी अनुदान.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना एकूण ६ मुख्य घटकांसोबत नवीन योजना २०१७-१८ या आर्थिक वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर तसेंच मुंबई शहर हे २ जिल्हे वगळून उर्वरित ३४ जिल्ह्या मध्ये ही योजना सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली होती. (ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
योजनेचा मुख्य उद्देश
राज्यातील भटकंती करत मेंढीपालन करणाऱ्या मेंढपालांना त्यांच्या व्यवसायातून चांगला नफा मिळवून देणे तसेंच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.
पारंपारिक पद्धतिने मेंढीपालन करत आलेल्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
राज्यातील अधिकाधिक सुधारित प्रजातीच्या मेंढ्याचा प्रसार करण्यावर जास्त भर देणे.
सातत्याने मेंढयांच्या कमी होत असणाऱ्या संख्येची वाढ करणे.
बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पद्धतीने करत असणाऱ्या मेंढीपालन व्यवसायला चालना देणे.
(ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
योजनेसाठी कोण पात्र असणार ?
महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातिल धनगर व तत्सम जमाती या योजने करिता पात्र ठरणार आहेत.
मुंबई तसेंच मुंबई उपनगर या जिल्ह्यातील व्यक्ती योजनेस पात्र नसतील, याची नोंद घ्यावी.
एका कुटूंबातील एकाच व्यक्तीला योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
अजादाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक
स्वराज्य संस्थेचे सदस्य किंवा पदाधिकारी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
ज्या लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीने या आधीच “राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेतला आहे, अशा व्यक्तीस पुन्हा या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही, तसेंच इतर ३ योजने करिता अर्ज करता येता येऊ शकतो.
(ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
स्वताच्या मालकीची किमान १ गुंठा जागा नसलेले व्यक्ती “राजे यशवंतराव होळकर ” मधील घटक क्रमांक १, ८, १० व १५ मध्ये अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
शेळी मेंढी पालन जागा खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराची मालकी हक्काची कोणतीही शेतजमिन नसावी.(ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
वयोमर्यादा
सदर योजनेकरिता १८ ते ६० वय वर्ष असणाऱ्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. अथवा अर्ज स्वीकारण्यास अडचणी येऊ शकतात.
घटक निहाय कागदपत्रे वाचण्याकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :-
शासन निर्णय वाचण्यासाठी
अर्ज करण्याची प्रक्रिया :
(ahilyadevi mahamesh yojana online application 2024)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे विविध प्रकराच्या योजना राबवण्यात येतात. ज्या मध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष योजना,मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजना,मेंढी शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना,कुक्कुट पक्षांच्या खरेदी तसेंच संगोपनासाठी अनुदान योजना या चार योजनांमध्ये १८ प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. आणि त्याकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया देखील नुकतीच सुरु झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसा करता येतो या योजनेसाठी अर्ज.
सदर योजनेकरिता तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे . आणी त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर यायचे आहे.
वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लाल रंगा मध्ये एक ‘अर्जासाठी नोंदणी करा’ असा पर्याय दिसेल,त्यावर क्लिक करायचे आहे.
आता ‘नोंदणी करा’ या पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर काही सूचना देण्यात येतील. त्या सूचना व्यवस्थित वाचुन आणि समजून घ्या.
त्यापुढेच तुम्हाला ‘नवीन अर्जदार नोंदणी’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. क्लीक केल्यानंतर आता तुम्हाला याठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल. जी काळजीपूर्वक भरायची आहे.
वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर त्या खालीच तुम्हाला तुमची कौटुंबिक माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये आपले स्वतःचे नाव सोडून रेशन कार्ड नुसार कुटुंबातील सदस्यांची माहिती याठिकाणी टाकायची आहेत.
नियम अटी मान्य करून खाली देण्यात आलेल्या ‘सबमिट’ या पर्यायावर क्लीक करा. त्याआधी आपण भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या.
सबमिट करून पुढे आल्यानंतर तुम्हाला अर्जाची सर्व माहिती पुन्हा दाखवली जाईल. इथून देखील तुम्हाला आपल्या माहिती मध्ये बदल करता येऊ शकतो. आता त्यापुढील पर्यायावर म्हणजेच पुन्हा एकदा सबमिट बटनावर क्लीक करून , आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
आता तुम्हाला पुन्हा काही बाबी दर्शवल्या जातील, त्या वाचुन घ्या. त्यानंतर लाल रंगावर क्लीक करून ‘योजना निवडा’ असे नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला १८ प्रकारच्या योजना देण्यात आल्या आहेत. तुम्हाला आपल्या पात्रतेनुसार योजना निवडता येणार आहेत.
योजनेची निवड केल्यानंतर खाली देण्यात आलेल्या ‘पुढे चला’ या पर्यायावर क्लीक करायचे आहे.
आता तुम्हाला योजने बद्दल काही माहिती विचारली जाईल. ती योग्यरित्या आणि खरी माहिती भरणे आवश्यक असणार आहे.
माहिती भरल्यानंतर नियम अटी मान्य करून, सबमिट बटन वर क्लीक करायचे आहे.
सबमिट केल्यानंतर तुम्हाला मान्य आहे का ? विचारले जाईल. ‘मला मान्य आहे’ या पर्यायावर तुम्हाला क्लीक करायचे आहे. आणी ‘सबमिट करा’ या बटनवर क्लिक करायचे आहे.
तर मंडळी अशा प्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करता येणार आहे.
सबमिट झाल्यानंतर अर्जाची माहिती म्हणजेच पुढील प्रक्रिया काय असणार हे वरील फोटो मधील पद्धतीने सांगितले जाईल. ती माहिती देखील अगदी व्यवस्थित वाचुन घ्यावी.
तर मंडळी आम्ही आशा करतो की, ही माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा..
हेही वाचा: 2023 : पीक विमा मंजूर झाला की नाही , असे तपासा स्टेटस ऑनलाईन !
300 युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्य घर योजना , असा करा अर्ज !