Navy Recruitment 2024 : भारतीय नौदला मध्ये नोकरीची सुवर्णं संधी ! जाणून घ्या सविस्तर माहिती..

Navy Recruitment 2024 : भारतीय नौदला मध्ये नोकरीची सुवर्णं संधी ! जाणून घ्या सविस्तर माहिती..

 नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तर तुमच्या पैकी बरेचजणांना संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आणि ते त्या उद्देशाने बरीच तयारी देखील करत असताना दिसतात. तर आता भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आता भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Navy Recruitment 2024
Navy Recruitment 2024

Navy Recruitment 2024

तर मंडळी आनंदाची बातमी अशी की, आता भारतीय नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन कोर्स 2025 अंतर्गत एकूण 250 पदांच्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे.  त्यामुळेच इच्छुक तसेंच पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे सांगण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये प्रामुख्याने अविवाहित पुरुष तसेंच महिलांना देखील अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या भरती साठी जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज करायला हवा.

तर सदर भरती ही प्रामुख्याने जनरल सर्विस हायड्रो केडर,ट्रॅफिक कंट्रोल लॉजिस्टिक्स, पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर , नावल अर्मामेंट इन्स्पेक्टोरेट, शिक्षण तसेच इंजीनियरिंग आणि इलेक्ट्रिक ब्रांच या कॅडरसाठी राबविण्यात आली असून याकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. 

Navy Recruitment 2024

 केडरनिहाय रिक्त जागांची संख्या (Navy Recruitment 2024) :

 जनरल सर्विस( जीएसएक्स) हायड्रो केडर– च्या 56 जागा रिक्त आहेत.

 पायलट :- एकूण रिक्त जागांची संख्या 24 आहे.

एअर ट्राफिक कंट्रोल :- एकूण रिक्त जागांची संख्या 20

नावल एयर ऑपरेशन्स ऑफिसर : एकूण रिक्त जागांची संख्या 21

लॉजिस्टिक्स :- एकूण रिक्त जागांची संख्या 20

इंजिनिअरिंग ब्रांच :- एकूण रिक्त जागांची संख्या 36

नावल अर्मामेंट इन्स्पेक्टोरेट :- एकूण रिक्त जागांची संख्या 16

शिक्षण :- एकूण रिक्त जागांची संख्या 15

इलेक्ट्रिकल ब्रँच:- एकूण रिक्त जागांची संख्या 42 इतकी आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता केडर नुसार :

जनरल सर्विस( जीएसएक्स)/ हायड्रो कॅडर– उमेदवार हे ६०%  गुणांसह बीई/ बी टेक पदवी उत्तीर्ण झालेले असावे.

लॉजिस्टिक्स करिता उमेदवार हे ६० % गुणांसह बीई/ बीटेक पदवीधर असावेत. शिवाय एमएपीए प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालेले आवश्यक . बीएससी, बीएससी आयटी आणि बीकॉम यामध्ये प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण असणे गरजेचे असेल.  इतकेच नसून पीजी डिप्लोमा फायनान्स, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण झालेला असणे गरजेचे आहे.

पायलट, एअर ट्रॅफिक कंट्रोल, नावल एअर ऑपरेशन्स ऑफिसर– याकरिता उमेदवार ६०% गुणांसह बीई/बीटेक पदवीधर असावेत. 

वेबसाईटला भेट देणे आवश्यक :

नावल अर्मामेंट इन्स्पेक्टोरेट, शिक्षण, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल ब्रांचमधील पदांकरिता अर्ज करण्यासाठी पात्र  उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या वेबसाईटला भेट देऊन अधिकची माहिती घ्यावी लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

इच्छुक आणि पात्र उमेदवरांकरिता 29 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

 निवड प्रक्रिये नंतर  :

तर मंडळी सदर भरती अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशनमध्ये जे कोणी उमेदवार निवडण्यात येतील अशांना, भारतीय नौदलामध्ये १० वर्ष कालावधी साठी नोकरीची संधी देण्यात येणार आहे. 

ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना सुरुवातीची २ वर्ष प्रोबेशनचा कालावधी पूर्ण करणे आवश्यक असेल.पुढे जे उमेदवार लेफ्टनंट पदासाठी निवडले जातील अशा उमेदवारांचे मूळ वेतन हे ५६ हजार १०० रुपयांपासून सुरू यासोबतच भत्ते देखील देण्यात येतात. 

हेही वाचा: – Indian Railway Jobs 2024 Apply Online : बारावीनंतर रेल्वेत नोकरी कशी मिळते ? कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून ते मोफत प्रवासापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात.

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment