Drone Didi Yojana Maharashtra : ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा इथे..
केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या लखपती दीदी योजनेच्या अंतर्गतच आता ड्रोन दीदी योजना देखील राबवण्यात येणार आहे. ही योजना महाराष्ट्रासह , कर्नाटक तसेंच उत्तरप्रदेश मधील राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणार आहे.
एकूण ३,००० ड्रोन महिलांना वाटण्यात येणार असून , ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान योजनेसाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. प्रक्रिया सुरु झाल्यावर याबद्दलचा लेख देखील याठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल.
सदर योजनेद्वारे बचत गटातील महिलांना ८ लाख रुपयांचे अनुदान ड्रोन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. २०२४ ते २०२६ पर्यंत देशातील तब्ब्ल १५,००० महिला बचत गटांना सदर योजनेतून ड्रोन खरेदी करिता आर्थिक मदत केली जाणार आहे.
Drone Didi Yojana Maharashtra
योजनेसाठी लावण्यात आलेले काही निकष पूढीलप्रमाणे :
केंद्रीय सरकारद्वारे निवड करत्या वेळी काही निकष लावण्यात आले आहेत. जसे की, शेती योग्य जमीन प्रमाणपत्र, बचत गटातील महिलेची सक्रियता तसेंच नॅनो खताचा वापर , अशा प्रकारचे सध्या तरी निकष लावले गेले आहेत. या मध्ये पूढे आणखी वाढ होतीलच . या बद्दलची माहिती आम्ही अपडेट आल्यावर इथे नक्की देऊ , तोपर्यंत तुम्ही प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला आणखी काही नवीन अपडेट आल्यास सहज मिळून जाईल.(Drone Didi Yojana Maharashtra )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा :
स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १० हजार महिला बचत गटांना फायदा झाला असल्याचे सांगितले, तसेंच येणाऱ्या काळात महिलांना ड्रोन प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. (Drone Didi Yojana Maharashtra )
त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण हे ड्रोनचा वापर कसा करायचा, त्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भात असणार आहे. तसेंच योजनेसाठीच्या बचत गटांची निवड ही राज्य समिती कडे सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे निवड करण्याचे काम हे राज्य समिती यासोबतच कृषी संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ यांच्याकडे असणार आहे. कृषी विज्ञान केंद्र देखील याठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
योजने बद्दल आणखी काही नवीन अपडेट आल्यास आपल्या प्रभात मराठीच्या वेबसाईटवर कळणवण्यात येईल. तोपर्यंत तुम्ही प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा..
आणि ही माहिती आवडल्यास पुढे देखील नक्की पाठवा. जेणेकरून ही योजना जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
हेही वाचा: – Lakhpati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी योजना म्हणजे काय ?
लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर आता राज्यसरकारची लाडकी गृहसेविका योजना !