Udyogini Yojana Scheme 2024 : महिलांसाठीची उद्योगिनी योजना म्हणजे नेमकी काय ?

Udyogini Yojana Scheme 2024 : उद्योगिनी योजना म्हणजे नक्की काय ? कोणासाठी असणार ही योजना ?
Udyogini Yojana Scheme 2024
Udyogini Yojana Scheme 2024

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. सध्या महिलांसाठी अनेक नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. जेणेकरून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. अशीच एक योजना म्हणजे ‘उद्योगिनी’ योजना होय.

उद्योगिनी ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली महिलांसाठीची योजना आहे. उद्योगिनी यीजने अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात. (Udyogini Yojana Scheme 2024 )

उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना एकूण ८८ प्रकारचे व्यवसाय/उद्द्योग सुरु करण्याकरिता कर्ज योग्य व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

महिलांसाठीच्या एकंदरीत सर्वच योजना ह्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवण्यासाठी राबवल्या जात आहेत. त्यामुळे ही योजना देखील तितकीच महत्त्वाची आहे.  केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या या योजने बद्दल चला जाणून घेऊयात आणखी सविस्तर माहिती. 

केंद्र सरकारची उद्योगिनी योजना नेमकी काय ?

Udyogini Yojana Scheme 2024

देशातील महिलांना लघु उद्योग करण्यासाठी तसेंच त्यातून त्यांना आर्थिक स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ही योजना केंद्र सरकारने आखली आहे. या योजने अंतर्गत ८८ प्रकारच्या उद्योगाचा समावेश आहे. तसेंच उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत महिलांना  ३ लाखांपर्यंत कर्ज मिळवता येते.(Udyogini Yojana Scheme 2024 )

योजनेमागचा शासनाचा उद्देश ?

उद्योगिनी योजना देशातील  केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाच्या उद्देशाने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करण्याकरिता सुरु केली आहे. त्यामुळेच ही योजना महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. योजनेची सुरुवात सर्वात आधी कर्नाटक सरकार द्वारे झाली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने ही योजना संपूर्ण देशभरात राबवण्यास सुरुवात केलेली आहे.  ग्रामीण भागातील महिलांना प्रामुख्याने या योजनेचा लाभ देण्यात येतो.

उद्योगिनी योजने द्वारे किती कर्ज मिळते ?

उद्योगिनी योजनेतंर्गत महिलांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येते.

सदर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे  दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

दिव्यांग , विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये. तसेंच या महिलांना व्याजमुक्त कर्ज देण्यात येते.

इतर प्रवर्गातील महिलांना योजने अंतर्गत १० ते १२%  व्याजदराने कर्ज देऊ केले जाते. ज्या बँकेकडून कर्ज देण्यात येत त्या बँकेच्या नियमांनुसार व्याजदर असणार आहे.

वयाच्या मर्यादे बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी १८ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरतील. 

अर्ज करणाऱ्या महिलांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित असायला हवा.  महिलांनी याआधी इतर कर्ज घेतलं असेल आणि त्याची परतफेड केली नसेल्यास तर या योजने द्वारे कर्ज दिले जाणार नाही. 

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणें आहेत.
  • अर्जासोबत अर्जदार महिलेचे दोन पासपोर्ट आकराचे फोटो.
  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड.
  • रहिवासी दाखला.
  • अर्जदार महिलेचा जन्माचा दाखला.
  • जात पडताळणी प्रमाणपत्र.
  • दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना शिधापत्रिकेची प्रत जोडणे आवश्यक.
  • कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला.
अर्ज कसा करता येईल  ?

Udyogini Yojana Scheme 2024

उद्योगिनी योजना ही कर्ज घेण्याबाबत आहे. त्यामुळे या योजनेद्वारे कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार महिलांना आपल्या जवळील बँकेशी संपर्क साधावा लागणार आहे.

बजाज फायनान्स सारख्या वित्तीय संस्थां द्वारे देखिल या योजनेच्या अंतर्गत कर्ज देऊ केले जाते.

तर मंडळी हा लेख आपल्या संपर्कातील गरजूवंत महिलां पर्यंत नक्की पोहचवा. आणि अशेच नवनवीन माहितीपुर्ण लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

         येथे क्लिक करा 

शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या आणखी काही योजना 

एनपीएस वात्सल्य योजना नेमकी काय आहे ? कसा करावा अर्ज? वाचा इथे..

ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर माहिती इथे

लखपती दीदी योजना म्हणजे काय ?

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment