pm surya ghar yojana 2024 : सूर्यघर योजनेच्या अर्जांना मिळाली मान्यता !

pm surya ghar yojana 2024 : सूर्यघर योजनेच्या अर्जांना मिळाली मान्यता !
pm surya ghar yojana 2024
pm surya ghar yojana 2024

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्याला पीएम सूर्यघर योजने बद्दल नुकतीच एक नवीन अपडेट समोर आली आहे. पीएम सूर्य घर योजने बद्दल माहिती देणारा लेख आपण आधिच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार बऱ्याच शेतकरी बांधवानी योजनेसाठी अर्ज केला . आता त्या ज्या शेतकरी बांधवांनी योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांच्यासाठी आजची ही बातमी महत्वाची असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाड्यामधिल एकूण ८ जिल्ह्यामधुन  सूर्यघर योजनेसाठी ३१ हजार १५३  अर्ज प्राप्त झालेले होते. आणि त्यानंतर आता ३१ हजार १५६ अर्जापैकी  ३१ हजार १०२ अर्जांना मान्यता देखील मिळालेली आहे. इतकेच नाही तर महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार (pm surya ghar yojana 2024)  सूर्यघर योजनेचे छतावर संच बसविण्याचे काम देखील प्रगतिपथावर आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाड्यामधुन चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

पीएम सूर्य घर योजने अंतर्गत केंद्र सरकार ३ किलोवॅट असलेल्या क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांकरिता लाभार्थी ग्राहकांना ७८,०००/-  रुपयांपर्यंतची सबसिडी मिळवून देते.

तसे पाहायला गेलं तर, महाराष्ट्र राज्यातील  सौर प्रकल्प बसविणाऱ्या एकूण २५, ०८६ अर्जदारांना अनुदानाची रक्कम  १६० कोटी रुपये ग्राहकांना थेट हस्तांतरित केले जाणार आहेत. 

किती किलोवॅट साठी किती अनुदान ? 

घरगुती म्हजेच निवासी कुटुंबांकरिता प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत दिले जाते. 

३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त १ किलोवॅट क्षमतेकरिता रुपये १८,०००/- अनुदान देण्यात येते.

त्यानंतर ३ किलावॅट पेक्षा मोठ्या सिस्टीमकरिता एकूण अनुदान ७८,०००- रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे.

मराठवाड्यामधिल सूर्यघर योजनेचे लाभार्थी ठरलेल्यांची संख्या 

pm surya ghar yojana 2024

धाराशिव मंडल २,०६६

छ.संभाजीनगर ग्रामीण ३,६९६

छ.संभाजीनगर शहर ५,३६१

जालना मंडल ३,०९६

छ.संभाजीनगर परिमंडळ १२,१५३

परभणी मंडल ३,३४८

हिंगोली मंडल १,९००

नांदेड परिमंडल ८,९९४

लातूर मंडल ४,४८१

बीड मंडल ३,४०८

लातूर परिमंडल ९,९५५

नांदेड मंडल ३,७४६

छ.संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय ३१,१०२

तर मंडळी ही माहिती आवडल्यास पुढे आपल्या मित्र-परिवांपर्यंत नक्की पोहचवा. आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा !

 (जोइन होण्यासाठी येथे क्लीक करा ) 

शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना वाचा पुढीलप्रमाणे .

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment