Auto Hold In Car : कार मधील Auto Hold Function कसे काम करते ? काय आहेत त्याचे फायदे ?
काय तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याच्या विचारात आहात? पण कार बद्दल अनेक बारीक गोष्टी तुम्हाला माहीत नाहीयेत. तर ही माहिती तुमच्यासाठी. बऱ्याचदा नवी गाडी म्हणजेच नवीन कार खरेदी करताना, लोक त्यामध्ये चांगले फीचर्स शोधत असतात. याचा उद्देश त्यांना ड्रायव्हिंग करताना चांगला अनुभव यावा. शिवाय सेफ्टी देखील मिळावी असा असतो.
त्यामुळेच आता विविध कार कंपन्या देखील कारमध्ये नवनवीन फीचर्स घेऊन येते. यामुळे अशा कंपनीच्या गाड्या खरेदी कडे लोकांचा जास्त कल असतो.
तुम्हाला माहीत आहे का ? कार कंपनी आता ग्राहकांसाठी महत्त्वाचे फिचर्स देत आहे. ते म्हणजे ‘ऑटो होल्ड फंक्शन’. या फ़ंक्शन चा उपयोग कार चालकांना विशेषत: ट्रॅफिकमध्ये अडकल्यास किंवा उतार असलेल्या रस्त्यावर वाहन चालवताना होणार आहे. त्यामुळे हे फिचर्स अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे ठरत आहे.
तर आजच्या या लेखाच्या माध्यमातुन जाणून घेऊयात की कारमध्ये हे ‘ऑटो होल्ड फीचर’ (Auto Hold In Car) का महत्त्वाचे ठरते, आणि ते केव्हा वापरता येते.
ऑटो होल्ड फंक्शन म्हणजे काय, कसे काम करते ?
‘ऑटो होल्ड फंक्शन’ (Auto Hold In Car) कार मध्ये असलेले असे फंक्शन आहे जे कार थांबल्यानंतर काही काळ स्थिर होते. म्हणजेच, ज्यावेळी तुम्ही ब्रेक दाबून गाडी थांबवता आणि तुमचा पाय ब्रेकवरून काढता तेव्हा हे ‘ऑटो होल्ड फीचर’ आपोआपच ब्रेक दाबून ठेवते. आणि अशा परिस्थिती मध्ये फायदा असा होतो, की आपल्याला वारंवार ब्रेक दाबण्याची गरज लागत नाही.
‘ऑटो होल्ड’ फंक्शनचे फायदे
‘ऑटो होल्ड’ फंक्शन कार मध्ये असल्यावर ज्यावेळी तुम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकता तेव्हा ऑटो होल्ड फंक्शन तुमचा पाय ब्रेकवर दाबून ठेवण्याचे काम करत असते. यामुळे होते असे की, तुम्हाला वारंवार ब्रेक दाबण्याची गरज भासत नाही.
‘ऑटो होल्ड फंक्शन’ गाडी मध्ये असल्यामुळे कार मागे जाण्यापासून प्रतिबंधित होते. ज्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे थांबता येऊ शकते.