188 year old man rescued : १८८ वय वर्ष व्यक्तीच्या सुटकेचा दावा करणाऱ्या व्हिडिओ मागील सत्य काय ?

188 year old man rescued: १८८ वय वर्ष व्यक्तीच्या सुटकेचा दावा करणाऱ्या व्हिडिओ मागील सत्य ?
188 year old man rescued
188 year old man rescued

सध्या सोशल मीडियावर बेंगळुरूमधील एका गुहेतून १८८ वर्ष वृद्ध व्यक्तीचा सुटका केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बऱ्याच ठिकाणी चर्चा होत आहे. अनेकांना या व्हिडिओने आकर्षित केल्याचे पाहायला मिळते आहे.

वायरल व्हिडिओमध्ये अतिशय वृद्ध व्यक्तीला गुहेतून बाहेर काढताना दाखवण्यात येत आहे. आणि व्हिडिओच्या कॅपशन मध्ये तो व्यक्ती १८८ वर्ष जगलेला आहे. असा दावा करण्यात येतो आहे. आणि लोकांकडूनही व्हिडिओ वर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

परंतु आता तज्ञ आणि तथ्य-तपासकां द्वारे या दाव्याची सत्यता तपासायला सुरुवात केली आहे.

तपासकांद्वारे वयाचा दावा

काही तपासकांच्या मते इतिहासातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ही जीन कॅलमेंट होती. जिचे वय १२२ होते. त्यामुळे व्हिडिओ मधील वृद्ध व्यक्तीचे वय १८८ वर्ष असणे संशयास्पद वाटत आहे.

जीवित राहण्याच्या परिस्थितीवर शंका

व्हिडिओ मधील व्यक्ती हा गुहेत राहत होता. त्यामुळे विचार केला तर, एका गुहेत अशा विस्तारित काळासाठी जगणे जवळजवळ अशक्यच ठरते.(188 year old man rescued)

व्हिडिओ नेमका कधीचा ?

वायरल व्हिडिओ मागचे मूळ शोधल्यास असे लक्षात आले आहे की, त्या व्हिडिओला या आधी देखील बऱ्याच वेळा प्रसारित करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ जुना आहे की आत्ताचा यावर प्रश्न निर्माण होतो.

व्हिडिओवर लोकांची प्रतिक्रिया काय ?

हा व्हिडिओ सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वायरल होतो आहे. प्रसार माध्यमावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. बऱ्याच लोकांनी या दाव्याला आश्चर्यकारक मानले आहे. तर अनेकांनी ‘सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीचे आणखी एक उत्तम उदाहरण’ असं वक्तव्य केले आहे.(188 year old man rescued)

सोशल मीडियावर असे मोठ्या प्रमाणात अशी मोठ्या प्रमाणात माहिती पसरवली जाते ,जी की बऱ्याचदा खोटी किंवा सध्याची नसते. त्यामुळे वापरकर्त्यांनी पडताळणी न करता अशा गोष्ट शेअर करणे टाळायला हवे.

हेही वाचा :- जाणून घ्या कार मधील Auto Hold Function म्हणजे काय ? आणि कसे काम करते

 महिलांसाठीची उद्योगिनी योजना म्हणजे नेमकी काय ?

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment