Ladki Bahin Yojana : महिलांना पुन्हा मिळणार 3,000 रुपये !
काही महिन्यांपासून सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने (Ladki Bahin Yojana)आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांना १,००० रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
या योजनेला राज्यातून भरगोस प्रतिसाद देखील मिळतो आहे. त्यामुळेच यावेळी आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर पुन्हा एकत्र ३,००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या द्वारे याबद्दची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा शासनाकडून एक प्रकारे आनंदाची बातमी आहे. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी आणि बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घेणे गरजेचे आहे.
ऑक्टोबर महिन्यात मिळणार पैसे !
राज्यात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. गणपती नंतर आता नवरात्रोत्सव आणि लगेच दसरा दिवाळी येणार आहे. म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येतील असे आश्वासन सरकार द्वारे करण्यात येत आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत याबद्दलचे भाष्य केले आहे.(Ladki Bahin Yojana)
रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर योजनेचा हप्ता येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अशाच प्रकारे दिवाळीची भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे १,५००/- रुपये हे ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण ३,०००/- रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते. कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे ३०००/- रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते.
राज्यातील पात्र महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्यांचे पैसे देण्यात येणार आहेत.
कधी जमा होणार ३०००/- रुपये ?
नुकत्याच पार पडलेल्या एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा करताना ३०००/- रुपये महिलांच्या बँक खात्यावर येत्या १० ऑक्टोबरपर्यंत जमा केले जातील असे सांगितले आहे.
याचा अर्थ साधारणपणें ६ ते ७ दिवसांच्याआत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरूवात होऊ शकते.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.
येथे क्लिक करा: – whatsapp.com
शासनाच्या इतर योजना
Drone Didi Yojana Maharashtra : ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर माहिती इथे
Lakhpati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी योजना म्हणजे काय ?