TATA off-road SUV : 2025  मध्ये टाटा लाँच करणार महिंद्रा थारला टक्कर देणारी ऑफ-रोड एसयूव्ही !

TATA off-road SUV: 2025  मध्ये टाटा लाँच करणार महिंद्रा थारला टक्कर देणारी ऑफ-रोड एसयूव्ही !
TATA off-road SUV
TATA off-road SUV

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तर वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतातील आघाडीवर असणाऱ्या आणि लोकप्रिय असणाऱ्या वाहन उत्पादक कंपनीने म्हणजेच टाटा मोटर्सने आत्तापर्यंत अनेक वाहने भारतीय बाजारपेठेत आणली आहेत. आणि त्यांना भारतीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आता पुन्हा एकदा ऑफ-रोड क्षमतेसह आपली एक एसयूव्ही लाँच करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर ही कार महिंद्रा थार सोबत स्पर्धा करेल असे देखील मत कंपनीने मांडले आहे. चला तर मग जाणून घेऊयात की, कंपनी ही कार कधी लाँच करू शकते.

मीडिया रिपोर्टस द्वारे मिळालेल्या माहितीनुसार , टाटा मोटर्स कंपनी बऱ्याच वर्षानंतर ऑफ रोडींग क्षमतेसह एसयूव्ही लॉन्च करण्याच्या विचारात आहे. टाटा मोटर्स कंपनी आपली फ्लॅगशिप SUV TATA Harrier ची AWD व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे.

ICE व्हर्जन Harrier च्या व्यतिरिक्त, टाटा कंपनी AWD क्षमतेसह इलेक्ट्रिक व्हर्जन Harrier आणण्याची देखील शक्यता आहे. 

त्याची कॉन्‍सेप्‍ट व्हर्जन देखील टाटा यांनी भारत मोबिलिटीच्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यातच प्रदर्शित केली होती. (TATA off-road SUV)

लाँच कधी होणार ?
TATA off-road SUV 

मिळालेल्या माहितीनुसार ऑफ-रोडिंग Harrier EV बद्दल टाटा मोटर्स कंपनीने अद्यापतरी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाहीये. 

परंतु येत्या जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी कार्यक्रमादरम्यान या कारचे प्रोडक्शन व्हर्जन दाखवले जाणार असल्याची शक्यता आहे. 

फीचर्स कोणते असणार ?
  • हॅरियरमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी १२.३-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल.
  • ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी देण्यात येईल.
  • व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स असतील.
  • १०.२५-इंच फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10-स्पीकर JBL साउंड सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत. 
  • वायरलेस फोन चार्जिंग
  • पॅनोरामिक सराउंड (मूड लाइटिंगसह)
  • मल्टी-कलर ॲम्बियंट लाइटिंग
  •  6-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट
  • जेश्चर इनेबल्ड पॉवर टेलगेट आणि एअर प्युरिफायर सारखी फीचर्स यामध्ये देण्यात येतील. 
इंजिन आणि गियरबॉक्स कसा असेल ?

 टाटा हॅरियरमध्ये 2-लिटरचे डिझेल इंजिन देण्यात येणार आहे जे की, 170PS पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करू शकते. त्यानंतर इंजिनसोबतच  6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा देण्यात येईल.  

कारचे मायलेज
  • मॅन्युअल: 16.80 kmpl
  • ऑटोमॅटिक: 14.60 kmpl
सेफ्टी करिता :

प्रवाशांच्या सेफ्टीकरिता देखील कंपनिने विशेष काळजी घेतली आहे. ती अशी की कारमध्ये 7 एअरबॅग्ज (6 एअरबॅग मानक), हिल असिस्टसह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) अशा प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर, ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम म्हणजेच ADAS सुविधा देण्यात आलेली आहे. अशा अनेक फीचर्ससह ही गाडी लवकरच भारतीय बाजारपठेत येणार अशी अपेक्षा आहे.(TATA off-road SUV )

Auto Hold In Car जाणून घ्या कार मधील Auto Hold Function म्हणजे काय ? आणि कसे काम करते

तर मंडळी ही माहिती आवडल्यास पुढे नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन अपडेट वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य व्हा !

येथे क्लिक करा: –  whatsapp.com  

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment