Wheat Farming : गव्ह्याच्या या जाती ठरतात शेतकऱ्यांना फायदेशीर !
आपल्याला ठाऊक असेलच की एक महत्त्वाचे पीक म्हणून राज्यात उत्पादीत होणारे गहू या पीका कडे पाहीले जाते.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये गव्हाची पेरणी करण्यात येते.
तर प्रभात मराठीच्या आजच्या या लेखात आपण गव्हू पिकाच्या तीन प्रमुख जातीं विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही देखील गव्हू पिकाचे उत्पादन घेत असाल , तर हा लेख नक्किच तुम्हाला फायदेशीर ठरु शकतो.
गव्हाच्या सुधारित जाती
त्र्यंबक NIAW 301 :-
त्र्यंबक NIAW 301 ही गव्हाचीच एक जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये या जातीची लागवड केली जाते. कृषी तज्ञां कडून मिळालेल्या माहितीनुसार या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा १ ते १५ दिवसांचा आहे. महाराष्ट्र राज्यातील हवामान या जातीकरिता विशेष अनुकूल ठरते. शिवाय ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक ठरते.मध्यम कालावधीत काढणीसाठी तयार होणारा गव्हाचा हा वाण एक सरबती प्रकारातील वाण आहे.
चपातीसाठी या जातीचा गहू सर्वोत्कृष्ट मानला जातो. कारण या जातीच्या गव्हाचे दाणे हे जाड असतात.
एकरी १८ ते २० क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जाती पासून मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गव्हाची ही जात अधिक लोकप्रिय आहे.
गोदावरी : NIAW 295 :-
या जाती बद्दल बोलायचे झाले तर, गोदावरी हा गव्हाचा एक सुधारित प्रकार मानला जातो. राज्यातील अनेक प्रमुख गहू उत्पादन जिल्ह्यात या जातीचा उपयोग होताना दिसतो. परंतु या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा त्र्यंबक जातीपेक्षा कमीच आहे.(Wheat Farming)
गव्हाचा हा एक बन्सी वाण आहे. तांबेरा रोगास या जातीचे पीक प्रतिकारक असल्याचे समोर आले आहे.
या जातीचे गव्हाचे दाणे हे मोठे असतात. तसेंच जाती पासून मिळणाऱ्या गव्हापासून रवा, शेवया, कुरडया यांसारखे पधार्थ तयार केले जाऊ शकतात. शेतकऱ्यांना १८ ते २० क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जाती पासून मिळू शकते असे सांगण्यात येते.(Wheat Farming)
तपोवन NIAW 917 :
तपोवन जातीच्या गव्हाची देखील राज्यातील बऱ्याच भागांमध्ये शेती होते. ११५ दिवसांच्या कालावधिमध्येच या जातीचे पिक तयार होत असून, शेतकऱ्यांना १८ ते २० क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. तसेच बागायती भागात पेरणीकरिता या जातीची शिफारस केली जाते. बागायती भागात वेळेवर पेरणी करण्यासाठी गव्हाचा हा एक प्रकारे उत्कृष्ट सरबती वान म्हणून ओळखला जातो.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.. whatsapp.com
हेही वाचा: – Best Agriculture Apps : या 3 ॲप च्या मदतीने शेती होणार सुलभ !
Surya Ghar Yojana Maharashtra : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्य घर योजना , असा करा अर्ज !