Silver Price Today : 2024 च्या अखेरीस चांदीचे दर वाढणार !
मागील काही दिवसांपासुन सोने चांदीचे दर हे उच्चांकी पातळीवर असून दारामध्ये वरचेवर वाढ होतानाच दिसत आहे. त्यामागील कारण असे की, अमेरिकन फेडरल रिझर्वने केलेली व्याजदरातील कपात.
यासोबतच जागतिक पातळीवरील बऱ्याच देशांमधील तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती आणि देशातील अनेक मध्यवर्ती बँकांनी सोन्याची केलेली मोठ्या प्रमाणावर खरेदी इत्यादी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
आणि म्हणूनच आता येणाऱ्या काळामध्ये देखील सोने चांदीचे दर वाढत राहण्याची शक्यता तज्ञां कडून वर्तवण्यात येत आहे.(Silver Price Today)
आतापर्यंत गेल्या एक वर्षात चांदीच्या दरात कमालीची वाढ झालेली असून इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या मते यावर्षी आतापर्यंत १८८०५ रुपयांनी चांदीच्या किमती वाढल्या आहेत. तर या वर्षाच्या अखेरी पर्यंत चांदी ९८,००० रुपये प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सिल्वर ईटीएफ म्हणजे नेमके काय ?
सिल्वर इटीएफ हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. यामध्ये चांदीसारखे शेअर्स खरेदी करण्याची सुविधा देण्यात येते. याची तुम्ही स्टॉक एक्सचेंज वर खरेदी आणि विक्री करता येऊ शकते. सिल्वर ईटीएफचा बेंचमार्क स्पॉट सिल्व्हर किमती असल्याने तुम्ही चांदीच्या वास्तविक किमतीच्या जवळपासच्या किमतीत ते खरेदी करू शकता.
सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणारे फायदे :
या पद्धतीने खरेदी केलेली चांदी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये असते व ती डिमॅट खात्यात ठेवली जाते. याकरिता तुम्हाला वार्षिक डिमॅट शुल्क भरावे लागते. अशा प्रकारची चांदी खरेदी केल्यानंतर ती चोरीला जाण्याची भीती नसते.
गुंतवणूक केल्याने कमीत कमी प्रमाणामध्ये देखील चांदीची खरेदी करता येते. त्यामध्ये युनिटमध्ये चांदी खरेदी करता येते. त्यामुळे कमी प्रमाणात किंवा एसआयपी द्वारे चांदी खरेदी करणे सोपे जाते. यामधील १ युनिट सिल्वर ईपीएफ ची किंमत सध्या १००/- रुपयांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ तुम्ही शंभर रुपयांपेक्षा कमी पैसे देऊनही चांदीत गुंतवणूक करू शकता.(Silver Price Today)
सिल्वर ईटीएफ तुम्हाला कोणत्याही समस्यांशिवाय पटकन खरेदी देखील करता येते. आणि त्यांची विक्री देखील तितक्याच सहजपणे करता येऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जेव्हा तुम्हाला पैशांची फारच गरज भासते तेव्हा तुम्ही त्याची विक्री करून पैशाची जुळवाजुळव करू शकता.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.. whatsapp.
हेही वाचा: – 2025 मध्ये टाटा लाँच करणार महिंद्रा थारला टक्कर देणारी ऑफ-रोड एसयूव्ही !
Wheat Farming : गव्हाच्या या जाती ठरतात शेतकऱ्यांना फायदेशीर !