Custard Apple Farming : सीताफळ लागवडीतून लाखो रुपयांचे उत्त्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा !
सध्या शेती मध्ये बरेच नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. आपल्या शेतात फळबाग लागवड करुन तंत्रज्ञानाच्या सह्हायाने अधिकाधिक उत्पादन अतिशय कमी क्षेत्रात घेत लाखो रुपयांचा नफा मिळवण्याचा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वीरित्या केला आहे.
आपण पाहतो की बऱ्याचदा पारंपारिक शेती करित असताना पारंपारिक पिकांचा उत्पादन खर्च आणि मिळणारे शेवटी त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा कुठल्याही प्रकारे ताळमेळ लागत नसतो. अशा वेळी त्या शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी असे शेतकरी कर्जबाजारी देखील होतात.
त्यामुळेच आता अशा समस्या लक्षात घेऊन राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर शेती मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करित आहेत. बरेच शेतकरी या तंत्रज्ञानासह फळबाग तसेंच भाजीपाला शेतीकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. अनेक उच्च शिक्षित तरुण देखील नोकरीच्या मागे न धावता , शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहत आहेत. शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे अनेक नवनवीन बदल घडून येताना दिसत आहेत.
असाच एक बदल घडवून आणला आहे, जालना तालुक्यातील कडवंची या गावच्या प्रगतिशील शेतकरी कृष्णा क्षीरसागर यांनी. कृषा क्षीरसागर यांनी सिताफळाचे लागवड करून द्राक्ष बागेतून मिळणाऱ्या उत्पादनालाही मागे सोडत सिताफळातून लाखोंचे उत्पन्न मिळवण्याची पायरी चढली आहे.(Custard Apple Farming)
सिताफळ लागवडीतून लाखोचे उत्पन्न
जालना तालुक्यातील कडवंची या गावातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे कृष्णा क्षीरसागर यांनी आपल्या शेतात सिताफळ लागवडीचा प्रयोग यशस्वीरीत्या साध्य केला आहे. परंतु या अगोदरही ते द्राक्ष लागवडीतून द्राक्ष उत्पादन आणि त्यापासून मनुका तयार करणे अशा स्वरूपाने ते शेतीतुन नफा करत होते. द्राक्ष सोबतच त्यांनी मोसंबीची देखील लागवड केली, परंतु त्यामध्ये त्यांना पाहिजे तसे यश मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी आपल्या अडीज एकर शेतजमिनीत ९०० सीताफळांचे झाडे लावली. आणि यानंतर सुरु झाली खरी मेहनत. त्यांनी सीताफळाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले. आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये द्राक्ष आणि मोसंबी बागेपासून जे काही उत्पन्न मिळवले होते त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना सिताफळ बागेतून (Custard Apple Farming) मिळाले आहे.
( या 3 ॲप च्या मदतीने शेती होणार सुलभ !)
२०२४ वर्षात त्यांनी लावलेल्या अडीच एकरातिल ९०० सीताफळांच्या झाडांपासून जवळपास २२ ते २५ टन उत्पादन प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. जर ५०/- रुपये प्रति किलो इतका बाजार भाव मिळाला तर १० ते १२ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. आणि विशेष बाब अशी आहे की, त्यांनी या अडीच एकर सिताफळ बागेसाठी २ लाख रुपये इतका खर्च केलेला आहे.(Custard Apple Farming)
सन २०१८ यावर्षात त्यांनी सिताफळाची लागवड (Custard Apple Farming) केली होती. त्यानंतर लागवड केल्यापासून ३ वर्षांनी सिताफळाला फळ यायला सुरुवात झाली. आणि पुढे २०२२ मध्ये पहिल्या तोडणी दरम्यानच त्यांना २ लाखांचे उत्पन्न यातून मिळाले.
आणि त्यानंतर मात्र मिळणाऱ्या उत्पन्नाचा आलेख हा चढतच राहिला आणि दुसऱ्याच वर्षी त्यांना ५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. त्यानंतर तिसऱ्या वर्षी पाच लाखावरून उत्पन्नाचा आकडा तब्बल साडेनऊ लाख रुपयांवर येऊन ठेपला. आता त्यांचे हे ४ थे वर्ष असून यावर्षी देखील तब्ब्ल १२ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे.
तर प्रभात मराठीकडून कृष्णा क्षीरसागर यांना पुढील वाटचलिसाठी शुभेच्छा..आणि आशा करतो की हा लेख इतर शेतकरी बांधवांन नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. त्यामुळे अशाच नवनवीन माहिती पूर्ण अपडेट वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.
येथे क्लिक करा :- whatsapp.com/
हेही वाचा: – शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !