BMW CE 02 : भारतात लॉंच झाली बीएमडब्ल्यू सीई 02 जाणून घ्या काय आहेत फिचर्स ?
जगातिल नामांकित वाहन कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ( BMW ) बीएमडब्ल्यू कंपनीने नुकतीच आपली नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर बीएमडब्ल्यू सीई 02 म्हणजेच BMW CE 02 भारतीय बाजारपेठेत लॉंच केली आहे.चला तर मग जाणून घेऊयात बीएमडब्ल्यु च्या या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल थोडक्यात माहिती.
काय असणार स्कुटर ची किंमत ?
बीएमडब्ल्यू सीई 02 स्कूटरच्या एक्स-शोरूम किंमती बद्दल सांगायचे झाल्यास एक्स शोरूम किमत ही ४,४९,९००/- रुपयांपासून सुरू होते. शहरी भागात चालवण्यासाठी ही स्कुटर सोईस्कर ठरेल कारण, कंपनीने सांगितल्यानुसार त्यांची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर शहरी वातावरण लक्षात घेऊनच तयार करण्यात आलेली आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर बीएमडब्ल्यू सीई 02 ची कमाल पॉवर हि 11 kw इतकी असणार आहे.ब्तर जास्तीत जास्त टॉर्क 55 NM असणार आहे. यासोबतच कंपनीने सांगितल्यानुसार ही स्कूटर फक्त 3 सेकंदात 0-50 किमी प्रती तास वेग गाठू शकते. तसेंच स्कूटरमध्ये 3.9 kWh एअर-कूल्ड लिथियम बॅटरी बसवण्यात आली आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर बीएमडब्ल्यू मोटरराडने जर्मनी मधील म्युनिकमध्ये विकसित करण्यात आली आहे. शिवाय भारतामध्ये टीव्हीएस मोटर कंपनीद्वारे होसूरमध्ये ही स्कुटर उत्पादित करण्यात येईल.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे सीईओ आणि अध्यक्ष असलेले विक्रम पवाह असे म्हणाले की, बीएमडब्ल्यू सीई 02 स्कूटर प्रत्येक बाबतीत नवीन ठरणार आहे. चमकदार रचना तसेंच नाविन्यपूर्ण उपायांमुळे ती नवीन प्रकारच्या गतिशीलतेकरिता एक उत्तम साथीदार बनणारी स्कुटर आहे. इतकेच नाही तर, स्कुटरची रचना देखील उत्तमरीत्या तयार केली असून, नवीन पिढी आणि तरुणांना नक्की आकर्षित करेल अशी आहे.
बीएमडब्ल्यू मोटरराडने जुलैमध्येच सीई 04 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत सादर केलेली आहे. आणि त्याची किंमत 14.9 लाख रुपये इतकी आहे.
तर अशाच नवनवीन वाहनांच्या अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा. जेणेकरून नवीन काही अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचतील .