Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार ?

Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार ? 
Ladki Bahin Yojana latest Update
Ladki Bahin Yojana latest Update

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार? आणि किती रक्कम वाढवली जाणार ? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. राज्यस्तरीय वचनपुर्ती कार्यक्रमदरम्यान वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. तसेंच ही योजना राज्यातील लाडक्या बहिणींकरिता कायमस्वरुपी सुरु राहणार आहे.

Ladki Bahin Yojana latest Update

पुढे ते असेही म्हणाले की, या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सध्या मिळणारा दीड हजार रुपयांचा वाढवला जाऊन टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपयांपर्यंत केला जाईल.
” अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

राज्यातील कष्टकरू महिलांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे दिवस यावेत हीच एका भावाची प्रामाणिक इच्छा असते. आणि त्यामुळेच आम्ही बहिणींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेद्वारे दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर म्हणून देत आहोत. आणि हा आहेर थांबणार नाही, तसेंच ही योजना सुपरहिट असून दिवाळीच्या आधीच महिलांना भाऊबीज देण्यात आलेली आहे. आज सर्व महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे जमा झालेले आहेत. दिवाळी पूर्वीच राज्यातील महिला भगिनींच्या बँक खात्या मध्ये १७ हजार २०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ‘आमच्या महिला भगिनी बरेच कष्ट घेत असतात, नेहमी कुटुंबासाठी राबत असतात. याची नक्कीच आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणूनच अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून, आतापर्यंत राज्यातील २ कोटी २६ लाखाहुन अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.

महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांचे देखील कौतुक करित मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिला आणि बालविकास विभागाने सचिव अनुपकुमार यांच्या नियंत्रणाखाली अतिशय वेगाने योजनेचा लाभ देण्याचे काम केले आहे.(Ladki Bahin Yojana latest Update)

आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मान देखील वाढवायचा आहे. लाडकी बहीण योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे. लाडक्या बहिणींबरोबरच शासन आता युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच एक प्रकारे बळ देण्याचे काम करित आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना सुद्धा गती देण्याचे काम सुरु आहे.विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे. असे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यातील मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यासह कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळ,भरत गोगावले, अध्यक्ष स्थायी समिती, पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालय, भारत सरकार सुनिल तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, सचिव, महिला व बाल विकास विभाग डॉ.अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त कोकण डॉ.राजेश देशमुख, आयुक्त महिला व बाल विकास विभाग डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना डॉ.कैलास पगारे,जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त तसेच प्रशासक महानगरपालिका पनवेल मंगेश चितळे आदी मंत्री उपस्थित राहिले होते.(Ladki Bahin Yojana latest Update )

प्रभात मराठी व्हाट्सअप ग्रुप: – (येथे क्लिक करा )

योजना संदर्भातील आणखी बातम्या वाचा –

महिलांसाठीची उद्योगिनी योजना म्हणजे नेमकी काय ?

 ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर माहिती इथे

मुख्यमंत्री वयोश्री योजने साठी अर्ज कसा करावा ? 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment