Pm Surya Ghar Yojana Helpline Number : अर्ज करायचा आहे ? या नंबरशी करा संपर्क !

Pm Surya Ghar Yojana Helpline Number : अर्ज करायचा आहे ? या नंबरशी करा संपर्क !

Pm Surya Ghar Yojana Helpline Number
Pm Surya Ghar Yojana Helpline Number

आपण पाहतोय की सध्या महागाई मोठया प्रमाणात वाढत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधनाच्या दरा मध्ये देखील सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विजेच्या वाढत्या वापरामुळे विजबील देखील भरमसाठ येत आहेत. या सगळ्या पासून दिलासा म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवू शकता. यानंतर तुम्हाला मोफत वीज उपलब्ध होऊ शकते. आता सरकार कडून देखील सोलर पॅनल बसवण्याकरिता सहकार्य केले जात आहे.

भारत सरकार द्वारे घरावर सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता सोलार रूफटॉप सबसिडी योजना सुरु करण्यात आली आहे. सोलर रूफटॉप योजनेंतर्गत केंद्र सरकार देशात अक्षय ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. केंद्र सरकार कडून पात्र ग्राहकांना सोलर रूफटॉप बसविण्यावर सबसिडी देण्यात येते.(Pm Surya Ghar Yojana Helpline Number)

घराच्या छतावर सोलर रुफटॉप बसवल्याने विजेचा खर्च ३० ते ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

सोलर रुफटॉप २५ वर्षांसाठी वीज पुरवेल आणि या सोलर रुफटॉप सबसिडी योजनेत खर्च ५-६ वर्षात दिला जाईल. यानंतर तुम्हाला पुढील १९ ते २० वर्षे सोलारच्या विजेचा लाभ मोफत असेल.

जागा किती लागते ? आणि किती अनुदान मिळते ?

तसे पाहायला गेले तर, सोलर पॅनलसाठी जास्त जागची गरज भासत नाही.

एक किलोवॅट सौर ऊर्जेसाठी 10 चौरस मीटर इतकी जागा लागते.

आणि अनुदानाबद्दल बोलायचे झाल्यास, केंद्र सरकार कडून 3 KV पर्यंतच्या सोलार रूफटॉप प्लांटवर ४०% अनुदान दिले जाते. तसेंच 3 KV नंतर 10 KV पर्यंत २० % अनुदान देते.

सोलर रूफटॉप सबसिडी योजने बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. किंवा mnre.gov.in ला भेट द्या.

अर्ज प्रक्रिया :

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

वेबसाईटच्या होम पेजवर आपल्यावर तुम्हाला ‘Solar Roofing’ अर्जावर क्लिक करावे लागेल.

आता नवीन पेजवर तुम्ही तुमच्या राज्याच्या लिंकवर क्लिक करुन घ्या.

त्यानंतर तुमच्या समोर Solar Roof Application चे आणखी नवीन पेज ओपन होईल. आता यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करावा.

आणि अशा पद्धतीने तुम्ही सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करू शकता.

यॊजने बाबत अडचणी असल्यास इथे संपर्क साधू शकता :

(Pm Surya Ghar Yojana Helpline Number)

योजने बाबत काही अडचणी असल्यास किंवा अर्जा संदर्भातील काही समस्या असल्यास , तुम्ही मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रेनवाल च्या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे कॉल करून सर्व माहिती मिळवू शकता.
1800-180-3333

अशाच नवनवीन अपडेट साठी व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.

येथे क्लिक करा :-  whatsapp.com

शासनाच्या इतर योजना  :-

pm surya ghar yojana 2024 : सूर्यघर योजनेच्या अर्जांना मिळाली मान्यता !

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment