Aadhar Card Update Online : आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करता येते का ?
जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपले आधार कार्ड हे महत्त्वपुर्ण दस्ताएवजांपैकी एक झाले आहे. सरकारी कामकाजासाठी सध्या बऱ्याच ठिकाणी आधार कार्डची गरज भासते. जसे शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक असते.
सध्या शासना द्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. आणि त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक यूआयडीएआयशी लिंक असणे गरजेचे असते, कारण जेव्हा-जेव्हा तुम्ही ऑनलाइन काही आधार कार्डमध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी दिला जातो.
ऑनलाईन पद्धतीने मोबाइल नंबर लिंक करता येईल ?
Aadhar Card Update Online
तर तुम्हाला देखील आपला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करायचा असेल, किंवा जर तुम्ही नवीन नंबर घेतला असेल आणि तुम्हाला तुमचा नवीन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर तुम्हाला हे करता येईल. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की, आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर ऑनलाइन पद्धतीने मोबाईल वरूनच अपडेट करता येईल का ? तर याचे उत्तर आहे ‘नाही’. आधार कार्डमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर सध्या तरी ऑनलाइन अपडेट करता येत नाही. तो अपडेट करण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळील आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊनच तुम्हाला हे काम करता येणार आहे.
कसा करता येतो मोबाईल नंबर अपडेट ?
ही गोष्ठ लक्षात घ्या की, तुम्हाल आधार कार्डमधील मोबाइल नंबर केवळ ऑफलाइन पद्धतीनेच अपडेट करता येतो. चला तर मग जाणून घेऊयात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया काय असते ?
सर्वप्रथम आपल्या घराजवळील आधार नोंदणी केंद्रावर जावे.
आधार मधील नंबर अपडेट करण्यासाठी अथवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला करेक्शन फॉर्म भरावा लागेल.
हा फॉर्म भरून तुम्हाला आधार एक्झिक्युटिव्हकडे सबमिट करावा लागेल.
त्यांनतर बायोमेट्रिक्स देऊन तुमचे सर्व तपशील व्हेरिफाय केले जातील. आणी यासाठी तुम्हाला ५० रुपये देखील मोजावे लागू शकतात.
यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN Number दिला जाईल. या नंबर द्वारे तुंजी तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस चेक करू शकता.
आणि येणाऱ्या काही दिवसांतच तुमचा मोबाईल किंवा इतर् माहिती जी तुम्ही अपडेट केली होती, ती यशस्वीरित्या अपडेट होईल.(Aadhar Card Update Online)
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा: –whatsapp.com
हेही वाचा: – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार ?
Ratan Tata Car Collection या होत्या रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्या !