Top 40 Hp Tractors : ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे ? मग हे नक्की वाचा…

Top 40 Hp Tractors : ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे ? मग हे नक्की वाचा…

तर मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तुम्ही शेतकरी असाल, आणि शेती करिता चांगला परंतु परवडणारा ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात आहात, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी. तुम्हांला कल्पना असलेच की, शेती करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रा पैकी ट्रॅक्टर देखील एक प्रकारे मह्त्त्वाचे यंत्र आहे. ट्रॅक्टरचे महत्त्व शेतीच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे.

ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची बरिच कामे सोप्पी होऊन जातात. जसे की पूर्व मशागत ते पीक काढणी अशा सर्व कामासाठी लागणारे कष्ट ट्रॅक्टरच्या मदतीने कमी होतात.

सध्या अनेक शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी करत्यावेळी आपल्याला परवडणारा परंतु चांगल्यात चांगला ट्रॅक्टर मिळावा अशा पद्धतीनेच ट्रॅक्टरची निवड करताना दिसतात.

आता सणासुदीच्या दिवसात बरेच लोक नवीन वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असतात. तर तुम्ही देखील सणासुदिला शेतीसाठी ट्रॅक्टर घरी आणण्याचा विचार करित असाल , तर हा लेख एकदा नक्की वाचा. या लेखामध्ये आपण भारतातील काही पावरफुल अशा 40 एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर बद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

१) स्वराज 735 XT
Top 40 Hp Tractors
Top 40 Hp Tractors

स्वराज कंपनीची निर्मिती असलेल्या या ट्रॅक्टरमध्ये 3307 सीसी क्षमतेचे तीन सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहेत. तसेंच ते इंजिन 40 एचपी पावर जनरेट करण्याचे काम करतात. यासोबतच तीन स्टेज ऑइल बाथ प्रकारचे एअर फिल्टर देखील या ट्रॅक्टर मध्ये देण्यात आले आहेत.

(Top 40 Hp Tractors)

स्वराज 735 XT या ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 33 एचपी आहे. आणि त्याचे इंजिन 1800 आरपीएम जनरेट करण्याचे काम करते. ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता ही 1500 kg ठेवण्यात आलेली आहे.

आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर्ससह गिअर बॉक्स या ट्रॅक्टर मध्ये देण्यात आलेला आहे. दोन व्हील ड्राईव्ह असलेल्या या ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत ही ६ लाख तीस हजार रुपये ते ६ लाख 73 हजार रुपये पर्यंत आहे.

२ ) महिंद्रा ओजा 3140 ट्रॅक्टर

Top 40 Hp Tractors

Top 40 Hp Tractors
Top 40 Hp Tractors

महिंद्रा ओजा 3140 हे महिंद्रा कंपनीचे असलेले एक शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. आपल्याला तीन सिलेंडर इंजिन या ट्रॅक्टर मध्ये पाहायला मिळतील, जे की, 40 हॉर्स पावर तसेंच 133 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. यासोबतच ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर देखील देण्यात आला आहे. तसेंच ट्रॅक्टरला कमाल पीटीओ पावर 34.8 एचपी इतकी दिली आहे.

इंजिन :
ट्रॅक्टरच्या इंजिन बद्दल बोलायचे झाले तर, यामधील इंजिन 2500 आरपीएम जनरेट करण्याचे काम करते.

गीयरबॉक्स महिंद्रा ओजा 3140 :

यानंतर गीयरबॉक्स , 12 फॉरवर्ड+ 12 रिव्हर्स गियरसह गीयरबॉक्स देण्यात आलेला आहे. चार व्हील ड्राईव्हमध्ये हा ट्रॅक्टर येतो. यामध्ये ऑइल एमर्स ब्रेक सुद्धा आहेत .

महिंद्रा ओजा 3140 किंमत :

महिंद्रा ओजा 3140 ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत ही ७ लाख ६९ हजार पासून ते ८ लाख १० हजार रुपये इतकी सहा वर्षांच्या वॉरंटी सह देण्यात आली आहे. त्यामुळे या ट्रॅक्टर बद्दल तुम्ही क दिली आहे.

3) ACE DI 350 NG 
Top 40 Hp Tractors
Top 40 Hp Tractors

 

या ट्रॅक्टरमध्ये 2858 सीसी क्षमतेसोबत 3 सिलेंडरमध्ये वॉटर कुल्ड नॅचरल ऍस्पिरिटेड डिझेल इंजिन बसवले आहे. जे की, 40 एचपी पावर जनरेट करण्याचे काम करते. तसेच ड्राय टाइप एअर फिल्टर दिले असून या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 34 एचपी इतकी आहे. तर इंजिन 1800 आरपीएम जनरेट करण्याचे काम करते.

ट्रॅक्टरमध्ये ड्राफ्ट, पोझिशन आणि रिस्पॉन्स कंट्रोल प्रकार थ्री पॉईंट लिंकेज देण्यात आले आहे.(Top 40 Hp Tractors)

हे ट्रॅक्टर पावर स्टेरिंग सहित व यामध्ये देखील 8 फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअरसह एक गिअरबॉक्स देण्यात आलाय . दोन व्हील ड्राईव्ह मध्ये येणाऱ्या या ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत ५ लाख ५५ हजार ते ५ लाख ९५ हजार रुपये पर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे दोन हजार तास किंवा दोन वर्षाची वारंटी कंपनी कडून या ट्रॅक्टरला मिळते.

तर मंडळी ही माहिती आवडल्यास पुढे आपल्या शेतकरी  मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहचवा. आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा.

येथे क्लिक करा: whatsapp.com

हेही वाचा:

हे पुरस्कार दिले जातात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांना!

Custard Apple Farming : सीताफळ लागवडीतून लाखो रुपयांचे उत्त्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा !

Ladki Bahin Yojana latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार ?

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment