MSP 2024 Rabbi : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना दिवाळी बोनस !
राज्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दरम्यान दिवाळी सारखा मोठा सण देखील तोंडावर आला आहे. अशातच राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. तर लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना दिवाळीचा बोनस म्हणून ५,५००/- रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.(MSP 2024 Rabbi)
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना ३ हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहेच, तर त्यामध्ये आणखी काही निवडक महिलांना तसेंच मुलींना २,५०० रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच महिलांना दिवाळीच्या बोनस स्वरूपात ५,५०० रुपयांचा निधी बँक खात्यात जमा होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होतेय.
(MSP 2024 Rabbi)
दरम्यान आणखी एक बातमी समोर येतेय, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातील. केंद्र सरकार कडून देखील देशभरातील शेतकरी बांधवांना येत्या दिवाळी सणा निमित्त गिफ्ट देण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि यो निर्णय असा की, केंद्र सरकारकडून अनेक पिकांच्या एमएसपी मध्ये म्हणजेच किमान आधारभूत असणाऱ्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि या वाढी मुळे शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
हा निर्णय घेण्यात आला त्यावेळी केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षपदी उपस्थित होते. दरम्यान बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3% वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला गेला.
यासोबतच आणखी एक मोठा निर्णय या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला. हा निर्णय म्हणजेच, रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीत वाढ करणे. तर यामध्ये एमएसपीत वाढ होणारे पिक कोणते तर याची माहिती पुढीलप्रमाणें.
MSP वाढवण्यात आलेली पिके कोणती ?
मोहरी :-
केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार मोहरीवरील MSP ३००/- रुपये प्रति क्विंटलने वाढवला आहे. आणि यामुळे मोहरीचा दर आता ५,९५०/- रुपये इतका करण्यात आला आहे , तर यापूर्वी हा दर ५,६५०/- प्रति क्विंटल होता.
गहु :-
गव्हाच्या किंमती मध्ये प्रति क्विंटल १५०/- रुपयांनी वाढवून ती २,४२५/- रुपये इतकी करण्यात आली आहे तर, आत्ता पर्यंत हा दर २,२७५/- रुपये इतका होता.
मसूर :-
मसूर डाळीचा (MSP) एमएसपी सुद्धा प्रति क्विंटल २७५/- रुपयांनी वाढवला आहे. आणि यामुळे मसुरचा दर हा ६,४२५ रुपयांवरुन थेट ६,७००/- रुपये प्रति क्विंटल वर पोहचला आहे
हरभरा :-
हरभऱ्याचा MSP देखील केंद्र सरकारने २१० प्रति क्विंटलने वाढवला असल्यामुळे हरभऱ्याचा दर हा प्रति क्विंटल ५,६५०/- इतका झाला. आणि याआधी तोच दर ५,४४०/- रुपये प्रति क्विंटल इतका होता.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा :- WhatsApp.com
हेही वाचा: – लाडकी बहीण योजना 5,000 रुपये बोनस नक्की कोणाला ?
शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !