Anganwadi Vacancy 2024 : अंगणवाडी मुख्यसेविकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु..इथून करा अर्ज !
नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत नोकरी संदर्भातील अनेक अपडेट पोहचवत असतो. तर आजच्या लेखात सुद्धा आपण अशाच एका नवीन भरती बद्दल सविस्तर आढावा घेणार आहोत. ही भरती केवळ महिलांसाठी असणार आहे. त्यामुळे हा लेख राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या माहिलांपर्यंत नक्की पोहचवा. तर महिलांसाठी बाल विकास विभागा अंतर्गत ‘अंगणवाडी मुख्य सेविका’ या पदाकरिता नुकतीच एक भरती जाहीर करण्यात आली आहे.
सदर भरतीअंतर्गत गट ‘क’ या संवर्गातील सरळ सेवा भरतीकरिता अर्ज मागविले जात आहेत. भरती प्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झालेली आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे.(Anganwadi Vacancy 2024 )
Anganwadi Bharti 2024
पद :- अंगणवाडी मुख्य सेवका (महिला बाल विकास अंतर्गत)
पदांची एकूण संख्या :- एकूण १०२ रिक्त जागा या अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा :- भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचे वय हे २१ ते २८ वर्षे यादरम्यान असावे.
मासिक वेतन किती :- ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये दरमहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
अर्ज प्रक्रिया ही १४ ऑक्टोंबर २०२४ पासून सुरु झाली असून, ३ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
किती अंगणवाड्यात भरली जाणार पदे: –
राज्यातील एकूण २५ अंगणवाड्यात.
अर्ज पद्धती :-
या भरतीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. वेबसाईटची लिंक खालील प्रमाणे देण्यात येईल.
अर्ज शुल्क :-
अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १,०००/- रुपये शूल्क आकारले जाईल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९००/- रुपये शुल्क आकारले जाईल.
अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात वाचणे आवश्यक आहे. लिंक पुढील प्रमाणे आहेत.
जाहिरात PDF :- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :–येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप :-whatsapp.com/
हेही वाचा :- Jobs in India Post Payments Bank : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णं संधी, लगेंच करा अर्ज !
Bank of Maharashtra Job Vacancy : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया सुरु !