Central Reserve Police Force Jobs सीआरपीएफ मध्ये नोकरीची संधी, लगेंच करा अर्ज..
प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण नेहमीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जाणून घेत असतो, तर आजच्या या लेखात सुद्धा आपण नोकरी संदर्भातील नवीन अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत. अनेकांचे स्वप्न असते की, आपल्याला केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी मिळावी, आणि त्यासाठी ते तयारी देखील करत असतात. तर आता अशा उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण, ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ म्हणजेच CRPF अंतर्गत विविध पदांकरिता भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती द्वारे उपनिरीक्षक /मोटर मेकॅनिक या पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात भरती बद्दल सविस्तर माहिती.
(Central Reserve Police Force Jobs )
ही पदे भरली जाणार आहेत : उपनिरीक्षक /मोटर मेकॅनिक
एकूण पदसंख्या – १२४
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ डिसेंबर २०२४
शैक्षणिक पात्रता – उपनिरीक्षक / मोटर मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मेकॅनिक मोटार वाहनातील आयटीआय प्रमाणपत्र किंवा तीन वर्षांची अप्रेंटिसशिप केलेली असणे गरजेचे आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – सदर भरती साठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. हा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला डीआयजी (स्थापत्य),
महासंचालनालय, सीआरपीएफ, ब्लॉक नंबर-1, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पाठवावा लागणार आहे.
हे पद CRPF कायदा-१९४९ आणि नियम-१९५५ अंतर्गत देण्यात येते, तसेंच या पदाकरिता निवडलेले कर्मचारी भारतात कोठेही सेवा देण्यास जबाबदार असतील आणि त्यांना CRPF मधील पदाच्या गरजेनुसार कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी देखील ठेवण्याय येऊ शकते.
वेतनश्रेणी – उपनिरीक्षक/ मोटर मेकॅनिक या पदासाठी पगाराची सुरुवात ३५,४०० रुपये दरमहा अशी होईल. ते पुढे जाऊन १,१२,४०० रुपयांपर्यंत वाढेल.
जाहिरात PDF: – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप: – whatsapp.com/
हेही वाचा: –
Anganwadi Vacancy 2024 : अंगणवाडी मुख्यसेविकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु..इथून करा अर्ज !
Jobs in India Post Payments Bank : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णं संधी, लगेंच करा अर्ज !