Car Loans : दिवाळी मध्ये कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून १० लाख रुपये कार लोन केल्यावर किती येईल ईएमआय ?
What is the EMI for a 10 lakh car loan?
देशभरात सणासुदीचे वातावरण सुरु आहे. भारतीयांसाठी मोठा मानला जाणारा सण दिवाळी, काही दिवसांवर आली आहे. दिवाळीत अनेकजण नवीन वस्तू खरेदी करण्याकडे धाव घेत असतात. तर यावेळी नवीन कार घरी आणण्याचा विचार बऱ्याच लोकांचा असेल. त्यासाठी बँकेकडून कारलोन किती मिळेल ? किती ईएमआय भरावा लागेल? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडत असतील , तर काळजी करायची गरज नाही. कारण , आजच्या या लेखात आपण याच बद्दल माहिती घेणार आहोत.
तर मंडळी तुम्ही देखील कार घेण्यासाठी बँक कडून लोन घेण्याच्या विचारात असाल, तर तुमचा निर्णय चुकीचा नाहीये. कारण सध्या बँक आपल्याला सहजरित्या कार लोन उपलब्ध करून देते. आणि त्याची प्रक्रिया देखील आता सोपी आणि सुटसुटीत झालेली आहे. परंतु तुम्हाला कल्पना असलेच की लोन घेण्याआधी बँकेच्या काही अटी शर्ती असतात, यामध्ये तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्हाला कार लोन(Car Loans) सहजरित्या मिळते.
आता याही पुढे जाऊन तुम्हाला असाही प्रश्न पडत असेल की, कार लोन साठी तुम्हाला सर्वात कमी व्याजदर कोणत्या बँकेकडून मिळेल ? हा प्रश्न पडणे गरजेचेच आहे. कारण तुम्ही घेतलेल्या कर्ज परतफेडीवर व्याजदराचा मोठा प्रभाव पडतो . आणि म्हणूनच तुम्ही कमी व्याजदरात कार लोन ज्या बँकेकडून उपलब्ध होईल अशीच बँक तुम्ही कारलोन साठी निवडणार आहात, जेणेकरून तुमचा फायदा होईल.
दहा लाखाच्या कार लोनवर किती भरावा लागेल ईएमआय ?
तर तुम्ही साधारणता दहा लाखाचे कार लोन घेण्याच्या विचारात असाल, तर महिन्याला तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल ? याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.
(Car Loans)
बँक ऑफ इंडिया :
बँक ऑफ इंडिया कडून कारलोन घेण्यासाठी 8.85 टक्के व्याजदर आकारण्यात येत असून, बँक ऑफ इंडिया बँकेकडून तुम्ही 10 लाख रुपये कारलोन घेतले तर महिन्याला तुम्हाला 24,632 रुपये ईएमआय भरावा लागू शकतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया :-
स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील नामांकित बँक आहे. या बँकेकडून सध्या कार लोन साठी 8.75 % व्याजदर आकाराते. तर तुम्ही या बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन घेतले तर महिन्याला 24 हजार 587 रुपये इतका ईएमआय तुम्हाला भरावा लागू शकतो.
युनियन बँक ऑफ इंडिया :
युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक म्हणून ओळखली जाते. युनियन बँक ऑफ इंडिया कडून कारलोन साठी 8.70 टक्के व्याज आकारले जात आहे . तर तुम्ही या बँकेकडून दहा लाख रुपये कारलोन घेतले तर महिन्याला 24,565 रुपये ईएमआय भरावा लागू शकतो.(Car Loans)
एचडीएफसी बँक :
एचडीएफसी बँके कडून कारलोन घेण्याचा विचार करित असाल तर 9.40% इतके व्याजदर आकाराले जाईल. तसेंच 10 लाख रुपयांचे कारलोन वर तुम्हाला महिन्याला 24,881 रुपये ईएमआय भरावा लागू शकतो.(Car Loans)
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा या बँकेकडून 4 वर्षाच्या कालावधी करिता कारलोन दिले जाते. तर या कालावधीसाठी बँकेकडून 8.90% दराने व्याज आकारले जाते. तर तुम्ही या बँकेकडून 10 लाख रुपये कारलोन घेतले तर, महिन्याला तुम्हाला 24,655 रुपये ईएमआय भरावा लागेल.
अशाच नवनवीन अपडेट / बातम्यांसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.
यासाठी येथे क्लिक करा: – whatsapp.com/
हेही वाचा: Ratan Tata Car Collection : या होत्या रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्या !
Auto Hold In Car : जाणून घ्या कार मधील Auto Hold Function म्हणजे काय ? आणि कसे काम करते