Ladki Bahin Yojana 6th Installment Date : लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार ?
मागील काही दिवसांपासुन राज्यात सुरु झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील बऱ्याच महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. नुकतेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. यानंतर आता पुढचा हप्ता महिलांना कधी मिळणार याविषयी आपण आजच्या या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
(Ladki Bahin Yojana 6th Installment Date )
जसे की आपल्याला ठाऊक आहे. की १० ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. त्यानुसारच बऱ्याच महिलांच्या खात्या मध्ये ३०००/- रूपये आणि ७,५००/- रूपये जमा झाले होते.
ज्या पात्र महिलांना सप्टेंबरचा हप्ता आधीच मिळाला होता, त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून ३०००/- रूपये ऑक्टोबर मध्येच जमा झाले. तसेंच ज्या महिलांच्या खात्यात योजना सुरु झाल्या पासून तीन हप्त्यापर्यंतचा एकही रूपया जमा झाला नव्हता, अशा महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्या दरम्यान एकत्रितपणे ७,५००/- रूपये म्हणजेच योजना सुरु झाल्या पासुनचे सर्व हप्ते एकत्रितपणे जमा झाले आहेत.
दरम्यान आता हे निधी जमा झाल्यानंतर पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे डोळे लागून राहिले आहेत. मात्र आता महिलांना पुढील हप्त्या साठी वाट पाहावी लागणार आहे. कारण काही दिवसांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसे पाहायला गेल तर, विधानसभा निवडणूक ही २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून निवडणुकांचा निकाल हा लगेंच २३ नोव्हेंबर २०२४ ला जाहीर होणार आहे. त्यामुळे या दिवसांत महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही तर, थेट डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.(Ladki Bahin Yojana 6th Installment Date)
तर ही माहिती आवडल्यास पुढे नक्की पाठवा. आणि अशाच नवनवीन अपडेट / बातम्या वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाटसप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा : whatsapp.com
हेही वाचा: –Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडकी बहीण योजना 5,000 रुपये बोनस नक्की कोणाला ?