या शेअर मुळे वर्षभरातच 1 लाखाचे 12 लाख , गुंतवणूकदार झाले मालमाल !
तुम्हाला कल्पना आहे का की, शेअर मार्केट मध्ये असेही काही शेअर्स आहेत ज्यांच्या मुळे गुंतवणूकदारांना फार कमी कालावधीतच चांगला रिटर्न मिळाला आहे. तसेंच काही गुंतवणूकदार म्हणजे मल्टीबॅगरची शेअर्समधील गुंतवणूक एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दुप्पट गुंतणूक झाली. तर यांपैकी काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना अवघ्या ६ महिन्यांतच श्रीमंत केले आहे.
त्यापैकी असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे , तो म्हणजे बोंडाडा इंजिनिअरिंग लिमिटेड चा. तसे पाहायला गेले तर आत्ता या शेअरची किंमत ५६२.४५ रुपये इतकी आहे. या शेअर्स बद्दल सांगायचे झाले तर, अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांच्या पैशात दीडपट वाढ या शेअर्स मुळे झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या १ लाख रुपयांचे १२ लाख रुपयांत रूपांतर झाल्याचे समोर आले आहे.
सहा महिन्यात १ लाखाचे १.५० लाख
६ महिन्यांआधी या शेअरची किंमत २२५/- रुपये होती. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत शेअर्सने १५०% परतावा दिला आहे, अवघ्या सहा महिन्यामध्ये.
आजपासून सहा महिन्यांआधी तुम्ही देखील यामध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज रोजी तुम्ही गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे २.५० लाख रुपये झाले असते. म्हणजेच सहा महिन्यात १.५० रुपये फायदा.
वर्षभरात १ लाखाचे १२ लाख
बरेच गुंतवणूकदार या शेअर मुळे अगदी मालामाल झाले आहेत. एका वर्षाआधी शेअरची किंमत ४७.२०/- रुपये इतकी होती.तर तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच वर्षभरात त्याच्या गुंतवणूकदारांना १०९२% रिटर्नस मिळाला आहे. यानुसार तुम्हीसुद्धा एक वर्षा आधी १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत १२ लाख रुपये इतकी झाली असती.
३० ऑगस्ट २०२३ पासून हा शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध करण्यात आला होता. आणि तेव्हापासूनच या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना १६०० टक्क्यांपेक्षाही जास्त परतावा दिला. परंतु सध्याची या शेअरची स्थिती बघता, काही दिवसांपासून यामध्ये घसरण सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये १० टक्क्यांनी घसरण झाल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा: – दिवाळी मध्ये कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन केल्यावर किती येईल ईएमआय?
ही योजना वर्षभरातच महिलांना देते 2,32,000 रुपयांचा फायदा !