Agriculture News : कोंबडीच्या पिसांपासून सुरु केला नवीन व्यवसाय !

Agriculture News : कोंबडीच्या पिसांपासून सुरु केला नवीन व्यवसाय !
Agriculture News
Agriculture News

शेतीसोबतच जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी काहीना काही व्यवसाय करत असतात. यामध्ये कुक्कुटपालन म्हणजेच Poultry Farm हा व्यवसाय देखील शेतीसोबत करता येणारा फायदेशीर व्यवसाय म्हणून ओळखला जातो. सध्या बरेच तरुण नोकरीच्या मागे न धावता शेती, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायाकडे वळू लागले आहेत. अशातच कोंबडीपासून आणखी नव्या पद्धतीने लाखोंची कमाई होऊ शकते, हे सिद्ध करून दाखवले आहे, जयपूर येथील राधेश अग्रहरी या तरुणाने.(Agriculture News)

आत्तापर्यंत आपल्याला कोंबडी पासून अंडी , चिकन यांपासून उत्पन्न मिळवता येते, हे ठाऊक होते. परंतु कोंबडी पासून आणखी वेगळ्या पद्धतीने करता येणाऱ्या व्यवसायाची ओळख राधेश अग्रहरी या तरुणाने जगाला करून दिली आहे. राधेशने कोंबडीच्या पिसातुन लोकर आणि कागद निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे.

राधेश अग्रहरी उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथून येतात. त्यांनी २००६ साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी मिळवली आहे. त्यानंतर टेक्सटाईल त्यांनी डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बालाजी ओव्हरसीजमध्ये टेक्सटाईल डिझायनर म्हणून काम केले. परंतु त्यांना आधीपासुनच वेगवेगळ्या विषयाबद्दल जाणून घेण्याची आवड होती. आणि यामुळे ते जास्त काळ नोकरी करू शकले नाहीत.

एका वर्षानंतर राधेश यांनी पुन्हा क्राफ्ट्स अँड डिझाइन मध्ये प्रवेश घेतला आणि हे शिक्षण घेत असतानाच एका वेगळ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आणि तेव्हापासूनच त्यांना यामध्ये आवड निर्माण झाली. आणि पुढे आठ वर्षे त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात काम केले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन करत असतानाच आदिवासी महिलांसमवेत त्यांच्या संशोधनाला आणखी चालना मिळाली. ती अशी की, कोंबडीच्या पिसापासून लोकर फायबर बनू शकते याचा शोध त्यांनी लावला.

मुदिता आणि राधेश प्रायव्हेट लिमिटेड या नावाने त्यांनी २०१९ मध्ये स्वतःची कंपनी सुरु केली. राधेश असे म्हणतात की, आपल्या देशातील नद्यांची अवस्था फार बिकट आहे. बऱ्याचदा कचरा नद्यांमध्ये फेकला जातो. आणि याअनुषंगाने आम्ही या नव्या प्रकल्पावर काम करण्याचे ठरले. आणि कोंबडीच्या पिसांवर काम करण्यास सुरु केले . आजपर्यंत आमच्या कंपनीने जयपूर तसेंच पुणे येथील १५० लोकांना पोल्ट्री कचरा गोळा करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर ३ वर्षात ७० हजार किलो पिसे जमा केली आहेत.

सर्वप्रथम कोंबडीची पिसे एकत्र केल्यानंतर त्यांना निर्जंतुक केले जाते. आणि यानंतर त्यापासून धागा बनवला जातो. आणि मग त्या धाग्यापासून कापड आणि कागद तयार बनवला जातो.

एक किलो पंखापासून १२% कापड आणि ८८% कागदी साहित्य मिळते. तर एका कोंबडीपासून ७० ग्रॅम पिसे मिळतात. आणि विशेष म्हणजे एक किलो पांढरा कागद तयार करण्याकरिता २०० लिटर स्वच्छ पाणी वापरले जाते. तर कोंबडीच्या पिसापासून कागद बनवण्यासाठी फक्त १० लिटरच पाणी वापरता येते. तर या व्यवसायातून राधेश अग्रहरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्या या व्यवसायामधून अनेक नवीन तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

हेही वाचा: –  शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !

Agristack Yojana : ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment