Railway Special Train : दिवाळी निमित्त रेल्वेने गावाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर !

Railway Special Train : दिवाळी निमित्त रेल्वेने गावाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर !
Railway Special Train
Railway Special Train

राज्यासह देशभरात सणासुदीचे वातावरण सध्या सुरु आहे. अशातच सर्व सणांपैकी मोठा सण म्हणजेच दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बऱ्याच ठिकाणी दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीच्या अधिक सुट्ट्या नागरिकांना मिळतात. त्यामुळे अनेक जण नातेवाईंकाकडे किंवा आपल्या मुळ गावी जात असतात.

यामूळेच यंदाच्या दिवाळी सणानिमित्त गावाला जाणाऱ्या लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई,पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांकडे रवाना होणाऱ्या गाड्यांच्या संदर्भात आपल्या ५७० विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तर आता या निर्णयामुळे प्रवाशांना नक्कीच कन्फर्म तिकिट मिळणे शक्य होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई ,पुणे , नागपूर येथून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही दिवाळी निमित्त गिफ्टच दिले आहे.(Railway Special Train)

मध्य रेल्वे यंदाच्या दिवाळी निमित्त एकूण ५७० रेल्वेच्या फेऱ्या चालवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारपर्यंत एकूण सेवांपैकी ४२ सेवा पूर्ण झालेल्या आहेत. तसेंच या सर्व सेवा ८५ एक्स्प्रेस गाड्यांद्वारे देण्यात येणार आहेत.वातानुकुलित विशेष, वातानुकूलित शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र डबे असलेल्या अनारक्षित गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.(Railway Special Train)

लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वे ५७० रेल्वे गाड्या सोडणार असून त्यातील १८० ह्या गाड्या वरील राज्यात धावणार आहेत.(Railway Special Train)

यासोबतच उर्वरित ३७८ सेवा या उत्तर भारतातील गोरखपुर, दानापूर, छपरा, समस्तीपुर, बनारस, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी असणार आहेत. तसेंच या राज्यात धावणाऱ्या गाड्यांपैकीच १३२ सेवा मुंबईतून आणि १४६ सेवा पुण्यामधून आणि उर्वरित १०० सेवा इतर ठिकावरुन चालवण्यात येतील.

याव्यतिरिक्त दक्षिण भारताच्या प्रवाशांकरिता ८४ विशेष गाड्या ज्या की , करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बेंगळुरूपर्यंत धावणार आहेत. या विशेष गाड्यांकरिता प्रवाशांना आगाऊ बुकिंग सुद्धा करता येणार आहे. त्याकरिता तपशीलवार माहिती आणि इतर माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. लिंक पुढील प्रमाणे आहे.www.enquiry.indianrail.gov.in

हेही वाचा: – दिवाळी मध्ये कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन केल्यावर कितीयेईल ईएमआय?

Mahindra Diwali Offer 2024 : महिंद्रा देतंय ग्राहकांसाठी खास ऑफर , वाहन खरेदीवर लाखोंची सुट !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment