Diwali Hero Bike Offer 2024 : दिवाळी निमित्त हिरोची या वाहनावर खास ऑफर !
सध्या राज्यासह देशभरात सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अशातच दिवाळी सारखा मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजरात लोकांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. भारतात दिवाळी, धनत्रयोदशी मध्येच अधिकाधिक वाहनांची विक्री होत असते. दरम्यान दिवाळीचे औचित्य साधून हिरो मोटोकॉर्पने आपल्या 4 स्ट्रोक स्कूटर्सवर मोठी ऑफर देण्यास सुरवात केली आहे. तर तुम्हाला सुद्धा हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची आहे तर काय आहे ही ऑफर ? चला तर मग जाणून घेऊयात.
तर मित्रांनो हिरोची Xoom स्कूटरहिरो मोटोकॉर्पच्या या स्कूटरमध्ये BS6 सीरीजचे 110cc इंजिन देण्यात येते. जे की, 8.05bhp पॉवर जनरेट करण्याचे काम करते.
यासोबतच हीरोची ही स्कूटर 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग फक्त 9.35 सेकंदात घेऊ शकते. तसेंच या स्कूटरला फ्रंट डिस्क ब्रेक आणि इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम देखील दिली जाते.
आता Hero Xoom स्कूटरच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर, या स्कूटरची किंमत 2 लाख 52 हजार रुपयांपासून सुरू होते. यासोबतच आपल्याला स्कूटरसाठी पाच प्रकारचे कलर ऑप्शन मिळतात.
त्यानंतर हिरोची Destini ही स्कूटर देखील 124.6cc इंजिनसह मिळते. जी की, 9 bhp पॉवर जनरेट करते .
हिरोने या स्कूटरमध्ये एलईडी हेडलॅम्प, क्रोम मिरर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध करून दिली आहे.
या स्कुटरच्या कीमती बद्दल सांगायचे झाले तर Destini स्कूटर खरेदी करायची असेल तर त्याची किंमत ८०,०४८/- रुपयांपासून सुरू होते.
त्यानंतरची स्कुटर आहे . ती म्हणजे हिरोची Pleasure + XTEC स्कूटर. ही स्कूटर स्पोर्टी स्ट्रिप थीमवर बाजारा मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हेडलॅम्प तसेंच मेटर फॅन यांसारखे फीचर्स देण्यात येतात.
इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास, हिरोच्या या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन देण्यात येते, जे की 8 bhp पॉवर जनरेट करते.
हीरोची ही स्कूटर तुम्हाला ८३,११३/- रुपयांना खरेदी करता येईल.
हिरोच्या या तिन्ही स्कूटरवर मिळणार ऑफर!
आता जाणून घेऊयात ही ऑफर नेमकी काय आहे. तर मंडळी हिरो मोटोकॉर्पच्या या तीन स्कूटर्स देशभरातील कोणत्याही हिरो डीलरकडून खरेदी करतात. दिवाळीचे औचित्य साधून , कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही स्कूटरवर 5000 रुपयांची सूट आणि 15000 रुपयांचे बेनिफिट्स मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर तुम्हाला सुद्धा या ऑफर चा लाभ घ्यायचा असेल तर, आपल्या जवळील हिरोच्या डीलरशी संपर्क साधा आणि आपली दिवाळी आणखी गोड करा.
अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा :-whatsapp.com
हेही वाचा: – दिवाळी मध्ये कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन केल्यावर किती येईल ईएमआय?
या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा पगार , बोनस म्हणून !