TIFR Mumbai Bharti 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी
भरती सुरु…
नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण प्रभात मराठीच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. तर मंडळी आता नुकतीच टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत “लिपिक प्रशिक्षणार्थी” या पदाच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार या भरती द्वारे एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार असून, पदानुसार पात्र असतील अशा उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील या लेखाच्या आधारे आपला अर्ज सादर करू शकता. तर या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीची तपशीलवार माहिती.(TIFR Mumbai Bharti 2024)
पदाचे नाव :
लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते)
रिक्त जागा : 10
लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन)
रिक्त जागा : 5
दोन्ही पदाच्या एकूण रिक्त जागा :15
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरु शकतात.
टायपिंग आणि वैयक्तिक वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
(शैक्षणिक पात्रता तसेंच अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ पहावी. लिंक खाली देण्यात येईल.)
वयोमर्यादा
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे वय हे 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.(TIFR Mumbai Bharti 2024)
नोकरीचे ठिकाण
मुंबई
मासिक वेतन:
या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना दरमहा 22,000/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
भरतीकरिता अर्ज प्रक्रिया :
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत सुरु असणाऱ्या भरतीकरिता सदर उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच दिलेल्या तारखेपर्यंत हा अर्ज करायचा आहे. आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल.(TIFR Mumbai Bharti 2024)
मुलाखतीचा पत्ता :
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा,
मुंबई 400 005
अर्ज करण्याची तारीख :
दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत
महत्त्वाच्या सूचना :
टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखे पर्यंत अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या महत्त्वाच्या सूचना तसेंच भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचावी.
सदर भरतीसाठी अर्ज केल्या नंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखेस हजर राहणे गरजेचे असेल.
मुलाखतीची तारीख ही 18 नोव्हेंबर 2024 देण्यात आली आहे.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी. आणि त्यानुसार अर्ज करावा.
भरतीच्या लिंक्स :
मूळ जाहिरात : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
प्रभात मराठी व्हॉट्सअप : whatsapp.com/
Central Reserve Police Force Jobs : सीआरपीएफ मध्ये नोकरीची सुवर्णं संधी !