Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आचारसंहिता संपल्यावर मिळणार मोठी भेट ! 1,500 रुपयांऐवजी……; मुख्यमंत्र्यांची घोषणा !
शिंदे सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरत आहे. सदर योजनेच्या माध्यमातुन राज्यातील पात्र ठरलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला १,५००/- रुपयांचा निधी दिले जातोय. म्हणजेच एकंदरित एका पात्र महिलेला या योजने द्वारे वर्षभरात १८,००० रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येतो. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्याभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. आचारसंहिते पूर्वीच शासनाने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना दिले आहेत. नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळी सारखा मोठा सण असल्यामुळे ऍडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले.(Ladki Bahin Yojana)
परंतु सध्यस्थितीत माझी लाडकी बहीण योजना आचारसंहिता सुरू असल्या कारणाने तात्पुरती बंद केली गेली आहे. त्या योजनेतुन दिला जाणारा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. यासोबतच अर्ज स्वीकारणे सुद्धा बंद केले आहे.(Ladki Bahin Yojana)
योजना बंद झाली का ?
मागील काही दिवसांपासुन विरोधकांकडून बरेच आरोप करण्यात येत आहेत. त्यापैकी एक आरोप म्हणजे ही योजना बंद करण्यात आली आहे. परंतु या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये विरोधकांवर जबरदस्त प्रहार केले. तसेंच ही योजना तात्पुरती बंद करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली.
पुढील हप्ता कधी दिला जाणार ?
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार , लाडकी बहीण योजना कुणीही बंद पाडू शकणार नाही. तर सावत्र भावांनी योजने मध्ये खोडा घातला तर त्यांना जोडा नक्की दाखवा. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार. असे ते म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींना दिला जाईल , अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. एवढेच नाही तर या योजनेतुन दिल्या जाणाऱ्या १,५०० रुपयांत वाढ होईल म्हणजेच ही रक्कम भविष्यात वाढण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे.
व्हाट्सअप ग्रुप: whatsapp.com
हेही वाचा: – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार ?
Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडकी बहीण योजना 5,000 रुपये बोनस नक्की कोणाला ?