Diwali Special Train From Pune To Nagpur : असे असेल दिवाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक !

Diwali Special Train From Pune To Nagpur : असे असेल दिवाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक !

Diwali Special Train From Pune To Nagpur
Diwali Special Train From Pune To Nagpur

राज्यात सध्या सणासुदीची लगबग सुरु आहे. दिवाळी सारखा मोठा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण सुरु झाले आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून राज्यातील रेल्वे प्रवाशांकरिता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. रेल्वे प्रशासनाद्वारे पुणे ते नागपूर दरम्यान काही विशेष गाड्या सुरू करणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने सणासुदीच्या दिवसात राज्यातील प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळू शकतो.

चला तर मग जाणून घेऊयात पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रका बद्दल थोडक्यात माहिती.

अशा प्रकारे असेल विशेष गाड्यांचे वेळापत्रक :

(Diwali Special Train From Pune To Nagpur)

दिवाळीच्या दिवसात गावाला किंवा आपल्या मुळ ठिकाणी जाणाऱ्यांचे प्रमाण खुप असते. त्यामुळे बऱ्याचदा गर्दीचे प्रमाण खुप वाढते. त्यामुळेच प्रशासनाने रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात आणन्यासाठी पुणे ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत.

नागपूर-पुणे ही दिवाळी विशेष गाडी २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार होती. परंतु आता या गाडीचा कालावधी देखील वाढवण्यात आला असल्यामुळे आता ही गाडी २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत चालवली जाईल. अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. अर्थातच या गाडीच्या ७ फेऱ्या होणार आहेत.

यासोबतच पुणे-नागपूर ही दिवाळी विशेष गाडी २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार होती. पण या गाडीचाही कालावधी आता वाढवण्यात आलेला आहे. तर ही गाडी नवीन बदलानुसार २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधी पर्यंत चालवली जाणार आहे. या एक्सप्रेस ट्रेनच्या सुद्धा एकूण ७ फेऱ्या होणार आहेत. अर्थातच नागपूर पुणे अशा ७ आणि पुणे नागपूर अशा ७ फेऱ्या या विशेष ट्रेनच्या होणार आहेत.

{ दिवाळी निमित्त रेल्वेने गावाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर ! }

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा :-whatsapp.com

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment