Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांना, मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत मिळणार नोकरीची सुवर्णसंधी !
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर येत आहे. तर मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत “गट ‘ क ‘ ( अराजपत्रित / अ – मंत्रालयीन ) संवर्ग” या पदाच्या भरतीकरिता नुकतीच अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तर पदांनुसार पात्र ठरतील अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरु झालेली आहे.
Mumbai Customs Recruitment 2024
सदर भरती करिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, 17 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
चला तर मग जाणून घेऊयात भरती बद्दल तपशीलवार माहिती.
पदाचे नाव : मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत “गट ‘ क ‘ ( अराजपत्रित / अ – मंत्रालयीन ) संवर्ग”
एकूण रिक्त जागा – 44 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण – मुंबई
शैक्षणिक पात्रता:
सदर भरतीसाठी अर्जदार उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
( शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.)
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय हे १७ डिसेंबर २०२४ रोजी १८ ते २५ वर्षे असणे गरजेचे आहे. शिवाय मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटी मध्ये विशेष सूट दिली आहे.
अर्ज कसा कराल ?
मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत “गट ‘ क ‘( अराजपत्रित / अ – मंत्रालयीन ) संवर्ग” पदाकरिता इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्हाला खालील संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा लागणार आहे.
अर्जाची अंतिम तारीख :
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही १७ डिसेंबर २०२४ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन), अकरावा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001
(Mumbai Customs Recruitment 2024)
सूचना वाचा ;
सदर भरतीकरिता पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून दिलेल्या तारखेपर्यंत हा अर्ज सादर करायचा आहे.
तसेंच अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत लिफाफ्यामध्ये योग्यपद्धतीने बंद करून संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहे.
अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी भरतीची मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी. लिंक्स पुढील प्रमाणे .
महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.
हेही वाचा: – सीताफळ लागवडीतून लाखो रुपयांचे उत्त्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा !