Jamin Mojani Maharashtra : जमीन मोजणी म्हणजे काय ? अर्ज कुठे करावा ?
शेतकरी, खातेदार यांना आपल्या जमिनीच्या हद्दीबाबत शंका असल्यास किंवा बऱ्याचदा जमीनीवरून निर्माण होणाऱ्या वादामुळे जमीन मोजणी करायची गरज पडते. तर ही जमीन मोजणी भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक, भूमि अभिलेख अथवा नगर भूमापन अधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी अर्ज करून हद्द कायम मोजणी करता येते.(Jamin Mojani Maharashtra )
अतिशय अचूक पद्धतीने जमिनीची मोजणी करण्यात येत असते. आणि याकरिता बऱ्याचदा खासगी व्यक्तींच्या माध्यमातून किंवा सरकारी जमीन मोजणी सुद्धा करण्यात येते. तर आजच्या या लेखातून आपण जमिनीची मोजणी आणि तिचे प्रकार कोणते ? याबद्दल सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जमीन मोजणीचे प्रमुख प्रकार
- भूसंपादन संयुक्त मोजणी
- कोर्टवाटप मोजणी
- कोर्टकमिशन मोजणी
- हद्द कायम मोजणी
- पोटहिस्सा मोजणी
- बिनशेती मोजणी
- निमताना मोजणी
- सुपर निमताना मोजणी.
आता तुम्हाला वरील मोजणीच्या प्रकारांची कल्पना असलेच, परंतु निमताना मोजणी आणि सुपर निमताना मोजणी म्हणजे काय ? असा प्रश्न पडला असेल. तर या मोजणीचा असा अर्थ होतो की, मोजणी झाली आणि सव्र्व्हेअर यांनी हद्दीच्या खुणा दाखवल्या आणि अशी मोजणी मान्य नसेल तर याविरुद्ध अपील दाखल करता येते. असे अपील आपण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे दाखल करू शकतो आणि त्यानंतर तालुका निरीक्षक यांचे तर्फे ही मोजणी केली जाते. आणि अशा मोजणीस निमताना मोजणी म्हंटले जाते. याप्रकारेच सुपर निमताना मोजणी म्हणजे काय तर, आपल्याला निमताना मोजणी मान्य नसल्यास त्या मोजणीवर सुद्धा अपील करता येते, आणि असे अपील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे केले जाते, त्याला ‘सुपर निमताना मोजणी’ असे म्हणतात.(Jamin Mojani Maharashtra)
मोजणीची प्रक्रिया
सदर अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भाचा अर्ज भूमी अभिलेख कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर मोजणीच्या रजिस्टरवर त्यांची नोंद करण्यात येते. आणि त्यानंतर त्या अर्जाला एक क्रमांक देण्यात येतो. पुढे कार्यालयीन कार्यवाही झाल्यानंतर संपूर्ण फाईल ही मोजणी करणाऱ्या सर्वेअरकडे सोपवण्यात येते. आता हा सर्वेअर अर्ज करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या जमिनीच्या चारही बाजूंनी असणाऱ्या शेजाऱ्यांना मोजणीच्या कमीत कमी १५ दिवस अगोदर नोटीस पाठवून मोजणीची तारीख सांगतो.
सध्या सर्व जमिनीच्या मोजणी ह्या प्लेन टेबल पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहेत.
जमीन खालीवर असल्यास किंवा ओढ्या नाल्याची असल्यास तिचे आकारमान प्लेन टेबल पद्धतीने अचूक काढता येते. मोजणीच्या दिवशी एखादा शेजारील शेतकरी व्यक्ती जर गैरहजर राहिला तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरीमध्ये देखील मोजणी केली जाऊ शकते. परंतु मोजणी ज्या दिवशी केली जाणार आहे. याबाबतची नोटीस त्या शेतकऱ्यास देणे आवश्यक असते.(Jamin Mojani Maharashtra)
जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करता येतो ?
आपल्या जमीन मोजणीकरिता तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास, आपला अर्ज
तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्यासंबंधित सर्व शेत जमिनीच्या कागदपत्रांसह सादर करावा लागतो. तसेच कोणती मोजणी तुम्हाला करायची आहे. त्या संबंधित सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
Jamin Mojani Maharashtra
मोजणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ;
- तलाठी यांचेकडील चालू ७/१२ उतारा.
- ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्याचा कच्चा बिनस्केली नकाशा.
- रहिवासी पुरावा व ७/१२ उतारावरील नमूद सर्व धारकांचे आधारकार्ड व पत्रव्यवहाराचा पत्ता.
- मोजणी फी चलन भरलेबाबतचे मूळ चलन व झेराक्स.
हेही वाचा :- Best Agriculture Apps या 3 ॲप च्या मदतीने शेती होणार सुलभ !
Gram Farming : 23 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या सुधारित जातीपैकी एक ही आहे
व्हॉटसअप ग्रुप :- whatsapp