Vidya Lakshmi Yojana : केंद्र सरकारच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंतचे कर्ज !
देशातील विविध समाज घटकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात. ज्यामध्ये अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजना आखल्या जातात. आणि सध्या शासनाच्या भरमसाठ योजना सुरु आहेत. ज्यामध्ये महिला आणि शेतकरी कामगारांसाठी असलेल्या योजना अधिक आहेत.
अशाच प्रकारे आता केंद्र शासन विद्यार्थ्यां बद्दल देखील विचार करताना दिसत आहे. त्याचे कारण असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अशा योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे , ज्या अंतर्गत पैशांच्या कमतरतेमुळे हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
देशातील गरजूवंत आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ‘पीएम विद्यालक्ष्मी योजना’ सुरू केली आहे. या योजनेला बुधवारी केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे.(Vidya Lakshmi Yojana)
एका वर्षाला २२ लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे आता पैशाच्या कमतरतेमुळे उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीएम विद्या लक्ष्मी’ योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे.
10 लाखांचे मिळणार कर्ज :
‘पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या’ (Vidya Lakshmi Yojana) माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना पैशा अभावी उच्च शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, त्यामुळे केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने ‘पीएम विद्यालक्ष्मी योजना’ सुरू केलेली असून या योजनेला बुधवारी केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. तसेंच पीएम विद्यालक्ष्मी’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांचे कर्ज अगदी सहजपणे उपलब्ध होणार आहे. देशातिल टॉप मध्ये असलेल्या 860 प्रतिष्ठित उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता हे कर्ज देण्यात येईल.
अनेकदा हुशार विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून नोकरीच्या धावावे लागते. तर अशा गरजूवंत मुला-मुलींकरिता ही योजना नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.
योजनेची विशेष बाब म्हणजे ‘पीएम विद्या लक्ष्मी’ योजनेच्या माध्यमातून कोणत्याही गॅरंटी विना शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाकरिता भारत सरकारच्या माध्यमातून साडेसात लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेकरिता 75 % क्रेडिट गॅरंटी देणार आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना बँकेमधूम अतिशय सहजरित्या कर्ज घेता येणार आहे. आता ह 10 लाख रुपयांचे कर्ज विद्यार्थ्यांना 3% व्याजदराने मिळणार आहे . तसेंच ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपये आहे अशा विद्यार्थ्यांना व्याजदरातून काही प्रमाणात सूट देखील देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कर्जाकरिता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांकरिता सुरु करण्यात आलेली ‘पीएम विद्यालक्ष्मी योजना’ ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. तसेंच या धोरणात या योजनेची शिफारस करण्यात आलेली होतीच. यामध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान करण्याची सूचना होती व त्यानुसार ही योजना आता प्रत्यक्षपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: NPS Vatsalya Scheme 2024 :एनपीएस वात्सल्य योजना नेमकी काय आहे ? कसा करावा अर्ज? वाचा इथे..